आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझ्या ‘त्या’ विधानाचा चुकीचा अर्थ लावला : अशोक चव्हाण, गैरसमज निर्माण होतील अशी वक्तव्ये टाळा : अजित पवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शिवसेनेकडून हमी घेतल्यानंतरच काँग्रेस या सरकारमध्ये येण्यास तयार झाल्याच्या वक्तव्यावरून महाआघाडीतील मित्रपक्षांत नाराजीचे सूर उमटत आहेत. मी असे बोललो नाही, माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ लावल्याचा खुलासा सार्वजनिक बांधकाम मंंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी केला.  चव्हाण म्हणाले, ‘मी तिन्ही पक्षांच्या किमान समान कार्यक्रमाबाबत बोललो होतो. तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन तो कार्यक्रम तयार केला आहे. तो लिखित दस्तऐवज आहे. मी जे बोललो ते त्या अनुषंगाने होते. मात्र त्या विधानाबाबत ज्या बातम्या आल्या, ती वस्तुस्थिती नाही. मी कुणाच्याही विरोधात बोललेलो नाही. आमचे सरकार उत्तम चालले आहे.’  

गैरसमज निर्माण होतील अशी वक्तव्ये टाळा : अजित पवार 
अमरावती - सहकाऱ्यांनी गैरसमज होतील असे वक्तव्य करू नये, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाआघाडीमधील नेत्यांना अमरावती येथे दिला. या वक्तव्यावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारला कसलाही धोका नसल्याचे अजित पवार यांनी या वेळी स्पष्ट केले. 

अजित पवार पुढे म्हणाले की, अशोक चव्हाण किंवा अजित पवार यांच्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आलेले नाही. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्रात सरकार स्थापन झाले आहे. हे नेते निर्णय घेतील तेव्हाच सरकारला धोका होईल.

बातम्या आणखी आहेत...