Home | National | Madhya Pradesh | Miss Behavior and tampering with women Video of viral in dhar indore

भर बाजारात बनत होता एका महिलेचा तमाशा, 'लाज' वाचवण्या एैवजी लोक बनवू लागले व्हिडयो....

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 11, 2018, 12:07 AM IST

विरोध केल्यामुळे ते दोघांनी तिला मारहाण सुरू केली.

  • Miss Behavior and tampering with women  Video of viral in dhar indore

    इंदुर- मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यातील मनावरमध्ये माणुसकिला काळीमा फासणारा व्हीडियो समोर आला आहे. येथे गुरुवारी आजाद मार्गावर बाइकवरून आलेल्या दोन व्यक्तिनीं एका महिलेला जबर मारहाण केली आहे. या दोघांवर छेडछाडिचा गुन्हा पण नोंदवण्यात आला आहे.

    बाइकवरून येताना आरोपींनी महिलेच्या पायावर गाडी घातली होती. याचा विरोध केल्यामुळे त्या दोघांनी तिला मारहाण करणे सुरू केले. त्यांनी हाता पायांनी त्या महिलेला मारले. या दरम्यान लोक त्या महिलेला वाचवण्याएैवजी व्हडीयो बनवण्यात व्यस्त होते.

    पोलिसांनी दिलेल्या माहीती नुसार, महिलेने तिच्या आजारी बहीणीला रूग्नालयात दाखल केले. त्यानंतर बाजारातुन खरेदी करून घरी जात होती. त्यावेळी आरोपींनी तिच्या अंगावर गाडी घातली. त्या महिलेने त्यांचा विरोध केला त्यामुळे आरोपींनी तिला शिव्या देण्यास आणि मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर पोलिसांच्या येण्याच्या आधीच आरोपींनी तेथून पळ काढला.

Trending