आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बगदादमध्ये अमेरिकी दूतावासाजवळ 2 रॉकेट हल्ले, ऑक्टोबरपासून आतापर्यंत 20 हल्ले

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकेने 3 जानेवारीला बगदाद एअरपोर्टवर ड्रोन हल्ला करुन इराणी सैन्य कमांडर कासिम सुलेमानीला मारले होते

बगदाद- इराकची राजधानी बगदादमधील ग्रीन झोनमध्ये आज(सोमवार) दोन रॉकेट हल्ले करण्यात आले. यापैकी एक रॉकेट अमेरिकेच्या दूतावासाजवळ पडले. हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाहीये. इराकमध्ये ऑक्टोबरपासून आतापर्यंत अमेरिकी ठिकानांवर झालेला हा 20 वा हल्ला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रॉकेट उच्च सुरक्षा असलेल्या ग्रीन झोनमध्ये पडले. या ठिकाणी सरकारी इमारती आणि अनेक देशांचे दूतावास आहेत.


इराकच्या किरकुक प्रांतात 27 डिसेंबरला सैन्य ठिकानांवर झालेल्या रॉकेट हल्ल्यात अमेरिकी कॉन्ट्रैक्टरचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात अनेक अमेरिकी आणि इराकी सैनिकदेखील जखमी झाले होते. आतापर्यंत सैन्य ठिकानांवर 30 हल्ले झाले आहेत. अमेरिकेने या हल्ल्यामागे इराण समर्थित ग्रूप हशद अल-शाबीला जबाबदार ठरवले आहे.

7 जानेवारीला अमेरिकी दूतावासावर 22 रॉकेट हल्ले

अमेरिकने 3 जानेवारीला बगदाद एअरपोर्टवर ड्रोन हल्ला करुन इराण सैन्य कमांडर कासिम सुलेमानीची हत्या केली होती. सुलेमानीच्या मृत्यूनंतर बगदादमधील अमेरिकी दूतावासाऴर 7 आणि 8 जानेवारीला हल्ले करण्यात आले. 7 जानेवारीला इराणने इराकमधील दोन अमेरिकी सैन्य ठिकानांवर 22 मिसाइल हल्ले केले.