आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत लागले खासदार गौतम गंभीर बेपत्ता असल्याचे पोस्टर, पोस्टरवर लिहीलं- 'शेवटचे इंदुरमध्ये दिसले होते...'  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मागच्या आठवड्यात व्हीव्हीएस लक्ष्मणने जतिन सप्रू आणि गंभीरसोबत इंदुरमध्ये जिलेबी खातानाचा फोटो शेअर केला होता
  • फोटो समोर येताच गौतमवर टीकेची झोड उठली, प्रदूषणावर होणाऱ्या बैठकीत उपस्थित नव्हता गौतम
  • 15 नोव्हेंबरची महत्वाची बैठक सोडून, भारत-बांग्लादेश सामन्यात कमेंट्री करायला गेला होता

नवी दिल्ली- माजी क्रिकेटर आणि भाजपचे खासदार गौतम गंभीर दिल्लीमध्ये वाढत्या प्रदुषणावर उपाय करण्यासाठी बोलवण्यात आलेल्या बैठकीत सामील न झाल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. आज(रविवार) दिल्लीमध्ये गौतम गंभीर बेपत्ता असल्याचे पोस्टर लावण्यात आले आहेत. त्या पोस्टरवर लिहील आहे, 'तुम्ही यांना पाहीलं का? इंदुरमध्ये जिलेबी खाताना शेवटचं दिसले होते. पूर्ण दिल्ली यांना शोधत आहे.'
गंभीर ट्रोल
गंभीर माग्या आठवड्यात इंदुरमध्ये झालेल्या भारत-बांग्लादेश कसोटी सामन्यात कंमेट्री करायला गेले होते. शुक्रवारी व्हीव्हीएस लक्ष्मणने जतिन सप्रू आणि गंभीरसोबत पोहे आणि जिलेबी खातानाचा एक फोटो ट्वीट केला. त्यानंतर गंभीरला युजर्सनी ट्रोल करणे सुरू केले. तसेच, विरोधकांनीही त्याच्यावर टीकेची झोड उठवली.

मागील सहा महिन्यातील काम पाहा- गंभीर
 
त्यानंतर गंभीरने ट्वीट केले की, 'मला शिव्या दिल्याने दिल्लीतील प्रदुषण कमी होणार असेल, तर मला भरभरून शिव्या द्या. मी माझ्या मतदारंघासाठी आणि शहरासाठी मागील 6 महिन्यात खूप काम केलं आहे.' यासोबत गंभीरने मागील सहा महिन्यात त्याने केलेल्या कामाची माहिती ट्विटरवरुन दिली.