आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅन्सरग्रस्त महिलेचा आवडता कुत्रा झाला होता बेपत्ता, परतण्याची नव्हती अाशा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फ्लोरिडा - अमेरिकेत जीवघेण्या कॅन्सरशी लढा देत असलेली एक महिला आपल्या घरी एक कुत्रा घेऊन आली. जो खूप कमी दिवसांतच तिच्या कुटुंबातील एक सदस्य बनला होता. परंतु तो कुत्रा काही दिवसच तिच्यासोबत राहून अचानक कुठे तरी बेपत्ता झाला होता. बऱ्याच शोधानंतरही तो सापडला नाही. मात्र, महिलेने हार मानली नाही. जवळपास अडीच वर्षांनंतर त्याचा शोध लागला. त्यानंतर त्यांची भेट झाली. जेव्हा ते दोघे एकमेकांना भेटले, ते दृश्य पाहून इतरांचेही डोळे पाणावले. 
 
नावाप्रमाणेच होता तिचा पाळीव कुत्रा
- ही कथा आहे फ्लोरिडा येथे राहणाऱ्या कॅमरन मेअर्स आणि तिच्या सैबेरियन हस्की ब्रीडचा  कुत्रा 'सेंपर फिडेलिस'ची. कॅमरेनला वयाच्या 23व्या वर्षी 2013 मध्ये लिंफोब्लास्टिक ल्युकेमिया नावाचा जीवघेणा आजार जडला. त्यानंतर किमोथेरपी देऊन तिच्यावर उपचार करण्यात आले.  

 

- आजार झाल्याचे समजताच कॅमरिनच्या आयुष्यात हा कुत्रा आला. लवकरच त्याच्याशी तिची गट्टी जमली. ती त्याला आपल्या परिवाराचा सदस्य मानू लागली. काही काळानंतर त्याच्या सहवासाची तिला इतकी सवय होऊन गेली की, तिला त्याच्याविना करमेनासे झाले. 


- कॅमरीनने या कुत्र्याचे नामकरण लॅटीन भाषेत 'सेंपर फिलेडिस' असे  केले. ज्याचा अर्थ कायम विश्वासू असा होतो. मेअर्सचे म्हणणे आहे की, तो त्याच्या नावाप्रमाणेच अतिशय विश्वासू होता. 

 

- 2016 साली कॅमरनला पुढील उपचारांसाठी कॅलिफोर्नियाला जायचे होते. उपचाराला गेल्यानंतर सेंपरची काळजी कोण घेणार हा प्रश्न तिला सतावत होता. तिच्या रूममेटने त्याची देखरेख करण्यास होकार दिला.       
  
अचानक रूममेटने दिली वाईट बातमी 
- कॅलिफोर्नियाला पोहोचल्यानंतर काही वेळातच तिला तिच्या रूममेटचा कॉल आला. तिने तिला सांगितले तू जशी गेली तसा सेंपरही दिसेनासा झालाय. ती फ्लोरिडाला परतल्यानंतर तिने खूप शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा शोध काही केल्या लागेना.   

 

- सेंपरला शोधण्यासाठी कॅमरनने शक्य ते सर्व प्रयत्न केले. ठिकठिकाणी पोस्टर लावले, पॉम्पलेट वाटले, व्हेटर्नरी डॉक्टरांपासून प्राण्यांशी निगडित काम करणाऱ्या सर्व संस्थांना जाऊन भेटली. त्यानंतर त्याबद्दल फेसबुक पेज, सोशल मीडियावरील सर्व ग्रुप्सवर त्यासंबंधी पोस्ट करत राहिली. 


- कॅमरनला त्याच्या सापडण्याची सर्वात जास्त अाशा त्याच्या गळ्यात लावलेल्या मायक्रोचिपमुळे होती. त्या चिपमध्ये कॅमरेनची सर्व माहिती दिलेली होती. जेणेकरून  सेंपर ज्याला कोणाला भेटेल तो तिला चिपच्या माध्यमातून संपर्क साधू शकेल. जेव्हा तो केवळ तीन महिन्यांचा होता तेव्हा ही चिप सेंपरच्या गळ्यात होती. तरीदेखील काहीच तपास न लागल्याने  तिला खूप त्रास झाला.

 

अखेर खासगी गुप्तहेरांनी केली मदत 

- बऱ्याच काळानंतर त्याविषयी काहीही माहिती न मिळाल्याने ती त्याचा शोध घेण्यासाठी चक्क खासगी गुप्तहेरांकडे गेली. त्याचा तपास घेत असताना एप्रिल 2017 मध्ये गुप्तचर त्या एजन्सीकडे पोहोचले ज्या एजन्सीने बनवलेली चिप सेंपरच्या गळ्यात होती. 

 

- त्याच एजन्सीने गुप्तचरांना सांगितले की , एप्रिल 2016 मध्ये एका महिलेने सेंपरच्या चिपमध्ये आपले नाव जोडले होते. नाव जोडताना कंपनीने हे पहिलेच नव्हते की, त्याच्या मूळ मालकाचे नाव आधीच त्या चिपमध्ये जोडले गेले आहे.


-  त्यानंतर खासगी गुप्तचरांनी माहिती मिळवली की, सेंपरला विकण्यासाठी एका ऑनलाइन साइटवर जवळपास १४ हजार रुपयांची जाहिरात देण्यात आली होती. चिपमध्ये नाव बदलल्यामुळे मेअर्सला याची माहिती नव्हती.


- त्यानंतर लवकरच त्या साइटची माहिती घेऊन त्यांनी सेंपरचा शोध लावला. मग पुन्हा एकदा त्याच्या मूळ मालक मिअर्सकडे तो पोहोचला. एकमेकांना भेटल्यानंतर ते दोघे अतिशय आनंदी झाले होते. मेअर्सच्या डोळ्यात पाणी आले, तेव्हा सेंपरही लाड करू लागला.

 
- विशेष बाब म्हणजे कॅमरनच्या रूमपार्टनरनेच त्याला चोरून विकले होते. तब्बल अडीच वर्षांनी  सेंपर परतला होता. त्यानंतर काही कालावधीतच तिचा कॅन्सरही बरा झाला.

 

 

बातम्या आणखी आहेत...