आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mission Chandrayaan 2: The Chandrayan 2 Will Descend On The Moon On September 6 7

मिशन चांद्रयान-2 : ६-७ सप्टेंबरला रात्री १:३० ते २:०० दरम्यान चांद्रयान चंद्रावर उतरणार; संपूर्ण जगाचे भारताकडे लक्ष

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरु - चांद्रयान-२ दक्षिण ध्रुवावर उतरताच हे यश मिळवणारा भारत पहिला देश ठरेल. चंद्राच्या उत्तर ध्रुवावर अमेरिका, रशिया, चिनी याने यापूर्वी उतरली आहेत.  चंद्रावर भारताचे पाऊल पडताना हा ऐतिहासिक क्षण टिपण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व ७० शाळकरी मुले बंगळुरूच्या इस्रो केंद्रात असतील.  चांद्रयानाने चंद्रापासून केवळ ३५ किमीवरून भ्रमण केले आहे. कुठे उतरायचे ती जागा यान स्वत: ठरवेल. यादरम्यान इस्रोचे निर्देश ते पाळू शकणार नाहीत.
 

हृदयाचे ठोके चुकवणार शेवटची १५ मिनिटे
> इस्रोचे अध्यक्ष के. सिवन म्हणाले, लँडिंगचा हा क्षण हृदयाचे ठोके चुकवणारा ठरेल. कारण इस्रोने यापूर्वी चंद्रावर अशा प्रकारे स्वारी केलेली नाही.  
> रात्री १.४० वाजता चांद्रयान ९० अंशांवर उतरण्यास प्रारंभ करेल. सुमारे १.५५ वाजता दोन क्रेटरदरम्यान ते लँड होईल. यानंतर दोन तासांनी ३.५५ लँडरचे रँप उघडतील.
> सकाळी ५.५५ वाजता रोव्हर (प्रज्ञान) लँडरबाहेर (विक्रम) येऊन चंद्रावर उतरेल. याची छायाचित्रे इस्रोला शनिवारी सकाळी ११ वाजता मिळतील.
 

संपूर्ण जगाचे भारताकडे लक्ष
नासाने म्हटले आहे की, भारताच्या या मोहिमेवर आमचे लक्ष आहे. कारण, २०२४ मध्ये नासा माणसांना चंद्रावर पाठवणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...