आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 'Mission Mangal' 'Batla House' Review: See Which Of The Two Films Wins Yesterdays Box Office

'मिशन मंगल' VS 'बाटला हाऊस'; जाणून घ्या कोणत्या चित्रपटाने कमाईच्या बाबतील पहिल्या दिवशी मारली बाजी 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रिलीज झालेला अक्षय कुमारचा 'मिशन मंगल' भारताच्या "मंगलयान" मोहिमेची गोष्ट आहे. इस्रोचे शास्त्रज्ञ राकेश धवन हे पात्र साकारणाऱ्या अक्षय कुमारने अभिनयाने पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मने जिंकली आहेत. अक्षय सोबत मुख्य भूमिकेत विद्या बालननेही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. "मंगळयान"ची यशोगाथा प्रेक्षकांना नक्की आवडेल.
 
तर दुसरीकडे, 2008 मध्ये दिल्लीत झालेल्या बाटला हाउस एन्काउंटरवर आधारीत 'बाटला हाऊस' हा चित्रपट रिलीज झाला. पोलिस आणि धर्माच्या नावावर होणाऱ्या दहशतवादावर हा आधारित आहे. दहशदवादाकडे पाहण्याची लोकांची धारणा आहे, त्यावर हा चित्रपट एक चपराक आहे. चित्रपटाचा नायक एसीपी संजय कुमार आहे. त्याची पत्नी नंदिता टीव्हीशोमध्ये अँकर आहे. चित्रपटात इंडियन मुजाहिद्दीनचे भारतामध्ये जे काम चालते, त्याच्या आवती भवती चित्रपटाची गोष्ट फिरते. 'बाटला हाउस' मध्ये एन्काउंटरनंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलवर जी अंतर्गत चौकशी झाले झाली होती, त्याबद्दल यात दाखवण्यात आले आहे. चित्रपटातील जॉनचे पात्र दिल्ली पोलिस डीसीपी संजीव यादव यांच्या आयुष्याशी प्रेरित आहे.

 

       

    चित्रपट समीक्षक तरण आदर्शनुसार, 'मिशन मंगल' चित्रपटाने पहिल्या दिवशी 29.16 कोटींचे गल्ला जमवला आहे. या कमाईसोबत हा अक्षय कुमारचा आतापर्यंतचा सर्वात जास्त ओपनिंग डे कलेक्शन असलेला चित्रपट बनला आहे. याच्या आधी त्याच्या "गोल्ड"ने 25 कोटी कमावले होते. दुसरीकडे जॉन अब्राहमच्या 'बाटला हाउस' ने पहिल्या दिवशी 14.59 कोटींची कमाई केली. "बाटला हाउस"ची "मिशन मंगल"सोबत टक्कर नसती, तर जॉनच्या चित्रपटाला त्याचा आणखी चांगला फायदा झाला अशता.

बातम्या आणखी आहेत...