आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mission Moon: India Becomes Super Power To Send Successful Spacecraft In Short Time In Low Cost

मिशन मून: सर्वात कमी खर्च, कमी वेळेत यशस्वी अंतराळ यान पाठवणारा भारत ठरला सुपर पॉवर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्राेचा नियंत्रण कक्ष - Divya Marathi
इस्राेचा नियंत्रण कक्ष

बंगळुरू  - इस्रोचे चांद्रयान-२ ने चंद्रावर पाऊल ठेवण्यास अवघ्या २४ तासांचा अवधी बाकी आहे. चांद्रयान-२ शुक्रवारी उशिरा रात्री व शनिवारी पहाटे सुमारे १ वाजून ४५ मिनिटांनी चंद्रावर पाऊल ठेवेल. इस्रो वैज्ञानिकांनी या मोहिमेचा ४५ दिवसांपूर्वी प्रारंभ केला होता. चांद्रयान-२ चे विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. आतापर्यंत तेथे केवळ चीनचे यान पोहोचू शकले आहे. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी इस्रोचे संशोधक १० वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. इस्रोनेच लँडर व रोव्हर तयार केले आहे. या क्षणाची संपूर्ण जगाला प्रतीक्षा आहे.  

उद्देश : खनिज, पाण्याचा शोध 
चंद्रावर खनिज, पाणी तसेच सजीव सृष्टीचा शोध घेणे हा चांद्रयान -२ चा उद्देश असून त्यासाठी शास्त्रीय तथ्यांचे संकलन केले जाईल. या शोधातून भारतासह संपूर्ण जगाचे कल्याण व्हावे, असा त्यामागील उद्देश आहे. विविध परिक्षण, अनुभवांच्या आधारे २०२३-२४ च्या भावी चांद्रयान-३ प्रकल्पातील नवीन तंत्रज्ञानाची दिशा-दशा निश्चित होणार आहे. चांद्रयान-२ लँडर विक्रम उतरणार असलेल्या भागातच चंद्रावरील भूकंपाची शक्यता पडताळणी जाणार आहे. थर्मल तसेेच गुरूत्वाकर्षण बळ किती आहे ? रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावरील तापमान व आर्द्रता आहे किंवा नाही हे शोधेल. 
 

दोन महत्त्वाच्या गोष्टी : मिशन २०२३-२४ च्या चांद्रयान-३ ची दिशा ठरणार 
२०१३ मध्ये रशियाच्या अंतराळ संस्थेची रोव्हर देण्यास मन
ाई 
1) रशियाची अंतराळ संस्था रॉसकॉसमॉसने २००७ मध्ये या प्रकल्पासोबत काम करण्याची इच्छा दर्शवतना इस्रोला लँडर देण्याची ग्वाही दिली होती. २००९ मध्ये चांद्रयान-२ चे डिझाइन तयार झाले. जानेवारी २०१३ मध्ये लाँचिंग निश्चित झाले होते. परंतु ऐनवेळी रशिया लँडर देऊ शकले नाही. त्यानंतर इस्रोने लँडर स्वत: बनवले. 
 

अमेरिका, रशिया, चीन यांनाच सॉफ्ट लँडिंगमध्ये यश 
2) इस्रोच्या चांद्रयान-२ मोहिमेमुळे अंतराळ विज्ञान विश्वात भारताला नवीन आेळख मिळेल. कारण आतापर्यंत ३ देशांनी चंद्रावर सुलभपणे यान उतरवले आहे. रशिया, युरोप, अमेरिका, चीन यांचा त्यात समावेश होतो. भारत, जपान, युरोपीय संघाने चंद्रावर या आधी मोहिमा केल्या. परंतु यान पोहोचवण्यात यश आले .
 

चांद्रयान-२ चा खर्च अॅव्हेंजर्सपेक्षा कमी  
> भारताने १० वर्षांत एकानंतर एक सर्वात कमी २० हून जास्त अंतराळ यान पाठवले. त्यांचा एकूण खर्च जगातील इतर देशांच्या अंतराळ मोहिमांच्या तुलनेत नगण्य म्हणावा असा आहे. देशातील तरूण संशोधकांवर विश्वास ठेवून व विदेशी संशोधकांना पाचारण करणे बंद करून भारताने हे करून दाखवले. 
> चांद्रयान-२ प्रकल्पावर ९७८ कोटी रुपये आला. अलीकडेच हॉलीवूडमध्ये झळकलेल्या ‘अँव्हेजर्स-एंडगेम’ वरील निर्मितीहून कमी आहे. चित्रपटाच्या निर्मितीवर २ हजार ५६० कोटी रुपये खर्च आला होता. 
> अमेरिकेच्या स्पेस अँड आेसियन स्टडिज प्रोग्रॅमशी संबंधित चैतन्य गिरी म्हणाले, भारताने आशियात कमी बजेेटमध्ये उपग्रह व अंतराळ मोहिम राबवण्याची प्रतिमा तयार केली. २०१७ मध्ये े विक्रमी १०४ उपग्रह एकाचवेळी अंतराळात रवाना केले होते. 
 

५० वर्षांत इस्रोने ३७१ उपग्रह अंतराळात पाठवले, पैकी १०२ देशाचे, २६९ विदेशी, ४२ अजूनही सक्रिय
> 15 ऑगस्ट,1969: इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रोची स्थापना
> १९ एप्रिल १९७५ : देशातील पहिला उपग्रह आर्यभट पाठवला.
> १० ऑगस्ट १९७९ : पहिले उपग्रह व्हेइकल (एसएलव्ही-३) प्रक्षेपित.
> १९ जून १९८१ : पहिला कम्युनिकेशन सॅटेलाइट-अॅपल एरियनने प्रक्षेपित.
> २० सप्टेंबर १९९३ : देशातील पहिल्या पीएसएलव्हीचे उड्डाण.
> १८ एप्रिल २००१ : जी सॅट-१ जीएसएलव्हीद्वारे अंतराळात पाठवले. 
> २२ ऑक्टोबर २००८ : चांद्रयान-१ रवाना. २०१४ मध्ये मंगळयान पाठवले.
> २२ जुलै २०१९ : इस्रोने चांद्रयान-२ पाठवले. ७ सप्टेंबरला पहाटे पोहोचेल
 
.