Home | Maharashtra | Mumbai | mistake in super 30 poster create controversy.

'सुपर 30' च्‍या पोस्‍टरवर गणिताचा चुकीचा फॉर्म्‍यूला, ट्विटरवर ऋतिक रोशन आणि निर्मात्‍याची उडवली जातेय खिल्‍ली

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Sep 07, 2018, 02:41 PM IST

शिक्षक दिनानिमित्‍त ऋतिक रोशनचा अप‍कमिंग सिनेमा 'सुपर 30'चे 3 पोस्‍टर लॉंच करण्‍यात आले.

 • mistake in super 30 poster create controversy.

  मुंबई - शिक्षक दिनानिमित्‍त ऋतिक रोशनचा अप‍कमिंग सिनेमा 'सुपर 30'चे 3 पोस्‍टर लॉंच करण्‍यात आले. या पोस्‍टर्सवरून आता वाद निर्माण झाला आहे. एका पोस्‍टरमध्‍ये ऋतिक रोशनचा चेहरा आणि गणिताचे काही फॉर्म्‍यूले छापलेले आहेत. मात्र ते चुकीचे आहेत. हे लक्षात येताच ट्विटरवर ऋतिक रोशन आणि निर्मात्‍यांची खिल्‍ली उडवली जात आहे.


  अशी आहे चूक
  ट्विटरवर एका यूझरने लिहिले आहे की, 'गणित तज्ञावर सिनेमा बनवत आहात आणि बेसिक गणितही माहिती नाही. तुम्‍हाला असायला हवे की, गणितामध्‍ये i^3 = -i नव्‍हे तर -1 असते. तसेच i = √-1 असते. याशिवाय इतरही फॉर्म्‍यूले चुकीचे आहेत.' मात्र ट्विटरवर एवढी टीका होऊनही अद्याप निर्माता तसेच ऋतिककडून कोणतेही स्‍पष्‍टीकरण आलेले नाही.

  ट्विटरवर उडवली जात आहे खिल्‍ली
  एका यूझरने कमेंटमध्‍ये लिहिले आहे की, बेसिक गणितच विसरले. तर दुस-या एका यूझरने विचारले आहे की, गणितात तुम्‍हाला किती मार्क्स मिळाले होते. आणखी एकाने म्‍हटले आहे की, हे काही अॅडव्‍हान्‍स मॅथ्‍स नव्‍हते. बेसिक होते. तेही जमल नाही.' तर एकाने म्‍हटले आहे की, 'कदाचित फोटोशॉपमुळे चूक झाली असेल.


  बिहारचे प्राध्‍यापक आनंद कुमार यांच्‍या जीवनावर बनत आहे सिनेमा
  'सुपर 30'मध्‍ये ऋतिक रोशन बिहारचे प्रोफेसर आनंद कुमार यांची भूमिका साकारत आहे. यामुळेच शिक्षक दिनी याचे पोस्‍टर रिलीज करण्‍यात आले. पुढील वर्षी 25 जानेवारीला सिनेमा रिलीज होणार आहे.

Trending