आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Smita Patil Birth Anniversary, Smita Patil Mother Dose Want Daughter To Marry With Raj Babbar

अभिनयासाठी स्मिता पाटीलचे सर्वत्र व्हायचे कौतुक, पण लागला होता संसार उद्धवस्त केल्याचा आरोप, आईच्या विरोधात जाऊन केले लग्न पण नव-याची मिळाली नाही साथ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः अभिनेत्री स्मिता पाटील यांची आज (बुधवार) 63 वी बर्थडे अॅनिव्हर्सरी आहे. 17 ऑक्टोबर 1955 रोजी पुण्यात त्यांचा जन्म झाला होता. नॅशनल अवॉर्ड आपल्या नावी करणा-या स्मिता यांनी एकीकडे अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केले, तर दुसरीकडे त्यांचे खासगी आयुष्य मात्र वादात राहिले. त्यांनी आईच्या मनाविरुद्ध जाऊन अभिनेते राज बब्बर यांच्यासोबत लग्न केले होते. या लग्नानंतर त्यांच्यावर घर तोडल्याचा आरोप लगा आणि मीडियात त्यांच्यावर बरीच टीका झाली. ज्या व्यक्तीसाठी स्मिता यांनी विरोध पत्करला, जगाचे टोमणे ऐकले त्याच्यासोबत संसाराची घडी नीट बसू शकली नाही.


न्यूज रीडरच्या रुपात स्मिता यांनी सुरु केले होते करिअर... 
- फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टीट्यूट येथून ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर स्मिता यांच्यावर दिग्दर्शक श्याम बेनेगल यांची नजर पडली आणि त्यांनी 'चरणदास चोर' या चित्रपटासाठी स्मिताला साइन केले. 1975 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटातून स्मिता यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 1975 ते 1985 या 10 वर्षांच्या काळात स्मिता यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. 


- लेखिका मैथिली राव यांनी स्मिताची बायोग्राफी 'स्मिता पाटिल: अ ब्रीफ इंसीटडेंस'मध्ये केलेल्या उल्लेखानुसार, 'स्मिताच्या आई स्मिता आणि राज बब्बर यांच्या नात्याच्या विरोधात होत्या. त्यांचे म्हणणे होते, की महिलांच्या अधिकारांसाठी लढा देणारी स्मिता एखाद्याचा संसार कसा मोडू शकते? पण स्मिता यांनी आईचा विरोध पत्करला आणि राज बब्बर यांच्यासोबत लग्न केले.' स्मिता यांचे हे पहिले तर राज बब्बर यांचे दुसरे लग्न होते. पहिल्या लग्नापासून राज बब्बर यांना जुही आणि आर्य बब्बर ही मुले आहेत.

 

मृत्यूनंतर रिलीज झाले होते 14 चित्रपट...

स्मिता यांच्या निधनानंतर त्यांचे सुमारे 14 चित्रपट रिलीज झाले होते. 'मिर्च मसाला', 'डांस-डांस', 'ठिकाना', 'सूत्रधार', 'इंसानियत के दुश्मन', 'अहसान', 'राही', नजराना', 'आवाम', 'शेर शिवाजी', 'वारिस', 'हम फरिश्ते नहीं', 'आकर्षण' आणि 'गलियों के बादशाह' ही त्यांच्या रिलीज झालेल्या चित्रपटांची नावे आहेत.

 

वयाच्या 31 व्या वर्षी झाले होते निधन... 

स्मिता पाटिल यांचे वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी निधन झाले होते. डिलिव्हरीनंतर स्मिता यांना इन्फेक्शन झाले होते. मुलगा प्रतिकच्या जन्मानंतर त्या हॉस्पिटलमधून घरी आल्या होत्या. पण इन्फेक्शन वाढल्याने त्यांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर हळूहळू त्यांचे एक-एक अवयव निकामी होते गेले. आई झाल्यानंतर 16 दिवसांनी म्हणजे 13 डिसेंबर 1986 रोजी त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला होता. स्मिता यांच्या निधनाच्य दोन दशकांनंतर दिग्दर्शक मृणाल सेन यांनी दावा केला होता की, स्मिता यांचा मृत्यू निष्काळजीपणामुळे झाला. 
 

बातम्या आणखी आहेत...