आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिताली राज म्हणाली, माझ्या देशभक्तीवरच शंका उपस्थित केली जातेय, कोच म्हणाले, ती फक्त स्वतःसाठी खेळते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - वरिष्ठ महिला क्रिकेटपटू मिताली राज हिने गेल्या काही दिवसांतील घटनांबाबत ट्विटरवर नाराजी व्यक्त केली आहे. नुकत्यात झालेल्या T20 वर्ल्ड कप स्पर्धेत मितालीला एका सामन्यातून बाहेर ठेवल्याने वाद झाला होता. त्यानंतर झालेल्या टीकेने मितालीला वेदना झाल्या आहेत. याच वेदना तिने ट्विटरवर व्यक्त केल्या आहेत. 

 

काय म्हणाली मिताली.. 
मितालीने ट्विटरवर म्हटले की, मला यामुळे अत्यंत वेदना झाल्या आहेत. माझ्यावर अत्यंत चुकीचे आरोप करण्यात आले आहेत. मी गेल्या 20 वर्षांपासून देशासाठी खेळत आहे. माझ्या रक्तात, घामात देशभक्ती आहे. पण माझ्या देशभक्तीवरच संका घेतली जाते हे अत्यंत वाईट आहे. माझ्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. हा माझ्या जीवनातील काळा दिवस आहे. देवा मला शक्ती दे. 

I'm deeply saddened & hurt by the aspersions cast on me. My commitment to the game & 20yrs of playing for my country.The hard work, sweat, in vain.
Today, my patriotism doubted, my skill set questioned & all the mud slinging- it's the darkest day of my life. May god give strength

— Mithali Raj (@M_Raj03) November 29, 2018

महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रमेश पोवार यांनी बीसीसीआयला एक अहवाल सादर केला होता. त्यात मिताली ही देशासाठी खेळत नसून स्वतःच्या विक्रमांसाठी खेळत असल्याचा आरोप त्यांनी मितालीवर केला होता. मिताली ही टीम मिटींगमध्येही फारसी व्यक्त होत नाही. तसेच टीमचा धीर वाढवण्याऐवजी फक्त स्वतःच्या कामगिरीवर तिचे लक्ष आहे. त्यामुळे इतर बॅटर्सवर दबाव निर्माण होत असल्याचेही त्यांनी म्हटले होते. त्यामुळे मितालीला वाईट वाटले. त्यापूर्वी उपांत्य सामन्यातून वगळल्यामुळे मितालीने व्यवस्थापनावर आरोप केले होते. तसेच कोच रमेश पोवार यांनी वाईट वर्तन केल्याचा आरोपही तिने केला होता. 

बातम्या आणखी आहेत...