आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठमोळ्या मिथिलाचा हा लूक बघून तुम्हीही व्हाल घायाळ, ब्लॅक आउटफिमध्ये दिसली ग्लॅमरस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः 'गर्ल इन द सिटी' आणि 'लिटिल थिंग्स' या वेब सीरिजसह 'कट्टी बट्टी', 'कारवा', 'चॉपस्टिक्स' या बॉलिवूड चित्रपटांमध्ये स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे मिथिला पालकर. कमी वयातच मिथिलाने बॉलिवूड आणि वेब सीरिजच्या दुनियेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

मिथिला कायम आपल्या ग्लॅमरस अंदाजमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर तिला फॉलो करणा-यांची संख्या दोन मिलियनच्या घरात आहे.  नुकतीच तिने ब्लॅक आउटफिटमधील स्वतःची छायाचित्रे इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहेत.

ब्लॅक कलरचे ब्रालेट त्यासह मॅचिंग पँट आणि ब्लेजरमधील तिचा लूक कुणालाही घायाळ करेल असा आहे. साजेसा मेकअफ, कर्ली हेअर्स आणि इयरिंग्सने तिच्या या लूकला चारचाँद लागले. 

मिथिलाने हा खास लूक मंगळवारी मुंबईत पार पडलेल्या फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाइल अवॉर्ड्ससाठी कॅरी केला होता. रेड कार्पेटवर मिथिला अतिशय आत्मविश्वासाने वावरताना दिसली. बॉलिवूडच्या अनेक ग्लॅमरस अभिनेत्रींना तिने मागे टाकले. सोशल मीडियावर मिथिलाने शेअर केलेल्या छायाचित्रांना चाहत्यांनी दाद दिलेली दिसून येतेय. 

बातम्या आणखी आहेत...