आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
पॉझिटिव्ह - अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव मिळू शकत. तुमचा आवाका वाढण्याचे योग आहेत. प्रवासाचे योग जुळून येत आहेत. नवीन लोकांची ओळख होऊ शकते, नवीन गोष्टी शिकण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळेल. एखादा नवीन अनुभव येईल. या सर्व गोष्टी तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकतात. येणाऱ्या काळात तुम्हाला करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळू शकते. मनामध्ये आर्थिक चिंता राहील. यातून बाहेर पडण्यासाठी पूर्ण प्रयत्न कराल. पैशांच्या बाबतीत एखादा सल्ला मिळू शकतो. सावध राहावे.
निगेटिव्ह - शत्रूंपासून सावध राहावे. सोबतचे काही लोक तुमच्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतील. एखादी गंभीर गोष्ट आज तुमच्यापासून लपवली जाऊ शकते. आज तुम्ही प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न कराल परंतु याच स्वभावामुळे संबंध तुटण्याची स्थिती निर्माण होऊ शकते. दाम्पत्य जीवनातील गोडवा कमी होऊ शकतो.
काय करावे - दिवसातून एकदा लसूण न टाकलेले अन्न खावे.
लव्ह - या राशीच्या अविवाहित लोकांना पार्टनरसोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करण्याची संधी मिळेल. लव्ह लाइफसाठी दिवस चांगला राहील.
करिअर - कामाच्या ठिकाणी शत्रूंमुळे चिंताग्रस्त राहाल. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. वकिली आणि पत्रकारिता क्षेत्रातील विद्यार्थ्यांना धावपळ करावी लागू शकते.
हेल्थ - जखम आणि अपघात होण्याचे योग आहेत. सावध राहावे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.