आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिलिटरी स्कूलमध्ये प्रथमच १२ मुली दाखल, कामगिरीतही त्या मुलांपेक्षा आघाडीवर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लष्कराच्या भविष्याचे असे प्रसन्न चित्र... - Divya Marathi
लष्कराच्या भविष्याचे असे प्रसन्न चित्र...

प्रताप छेत्री 

छिंगछिप (मिझोराम) - येथे दोन वर्षांपूर्वी केवळ मुलांना मिलिटरी स्कूलमध्ये प्रवेश दिला जात होता. मात्र, २०१७ मध्ये मिझोरामच्या छिंगपिंग मिलिटरी स्कूलमध्ये प्रथमच १० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या असून २०१८ मध्ये ६ मुलींना प्रवेश देण्यात आला होता. यंदा २०१९ मध्ये हा आकडा दुप्पट झाला आहे. या मुलींत एका लष्करी अधिकाऱ्याची मुलगी आहे.  वास्तविक, मिलिटरी स्कूलमध्ये मुलींना प्रवेश देण्याबाबत संरक्षण मंत्रालयाने एक पथदर्शक प्रकल्प सुरू केला होता. मुलांच्या तुलनेत मुलींची कामगिरी कशी असेल, हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न होता. हा प्रकल्प इतर मिलिटरी स्कूलमध्ये राबवता येईल का, यावरही विचार केला जाणार होता. हा प्रयोग यशस्वी झाला आणि गेल्या महिन्यात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी २०२१-२२ मध्ये देशात प्रत्येक मिलिटरी स्कूलमध्ये मुलींना प्रवेश दिला जाईल, अशी घोषणा केली होती. छिंगछिप मिलिटरी स्कूलमध्ये या वर्षी (२०१९-२०) ज्या सहा मुलींनी प्रवेश घेतला त्यातील तीन मिझोरामच्या आहेत. दोघी बिहारच्या, तर एक केरळची आहे. २०१८ पासून येथे शिकत असलेली जोनुनपुई म्हणते, “आता आमची फुटबॉल टीम पूर्ण आहे. आम्ही मुलांच्या टीमशी मुकाबला करू शकतो.’ दरम्यान, ११ वर्षीय मुस्कान आणि खुशबू म्हणते, “आम्हाला लष्करात जायचेय, देशाची सेवा करायची आहे... शत्रूचा नायनाट करायचा आहे.’या पथदर्शक प्रकल्पाबाबत स्कूलचे प्राचार्य लेफ्ट. कर्नल यू.पी.एस. राठोड यांनी सांगितले, “कॅडेट म्हणून या मुलींची कामगिरी अत्यंत उत्तम आहे. त्यांना मुलांसारखेच प्रशिक्षण दिले जाते. भावी काळात या सर्व लष्करात दाखल होतील.’ हे स्कूल २१२ एकर परिसरात असून मुलींसाठी वेगळे होस्टेल आणि वेगळे वॉर्डन आहेत. परिसरात सर्वत्र सीसीटीव्ही आहेत.५० वर्षांनंतर प्रथेला छेद
 
लष्करात जाती, वर्ग आणि धर्मभेद नसावा म्हणून माजी संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्ण मेनन यांनी मिलिटरी स्कूलची स्थापना केली होती. १९६१ मध्ये सातारा (महाराष्ट्र) येथे पहिले स्कूल सुरू झाले. आता देशात एकूण २८ स्कूल आहेत. २०२१ मध्ये प्रथमच या स्कूलमध्ये मुलींना प्रवेश मिळणार आहे.