आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#MeToo: मोदींचे मंत्री अकबर यांच्या 5 महिलांचा शोषणाचा आरोप, बचावात भाजप खासदारांचे वादग्रस्त वक्तव्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मीटू कॅम्पेनच्या वणव्यामुळे चित्रपट आणि मीडिया इंडस्ट्रीनंतर आता राजकारणापर्यंत ही आग भडकली आहे. याप्रकरणी नवे आरोप झालेत केंद्रीय मंत्री एमजे अकबर यांच्यावर. माजी संपादक अकबर यांच्यावर अनेक महिला पत्रकारांशी आक्षेपार्ह वर्तन केल्याचा आरोप आहे. मंगळवारी इतर चार महिलांचेही ट्वीट समोर आले. त्यांनीही अकबर यांच्यावर त्रास दिल्याचा आरोप केला आहे. तर भाजप खासदार उदित राज यांनी अकबर यांची पाठराखण करत आरोप करणाऱ्या महिलांवरच प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहे. 


प्रिया रमानींचा आरोप
प्रिया रमानी नावाच्या महिलेने ट्वीट करत केंद्रीय मंत्री आणि माजी संपादक एमजे अकबर यांच्यावर आरोप केले आहेत. प्रिया यांनी म्हटले की, अकबर संपादक होते तेव्हा हॉटेल रूममध्ये इंटरव्ह्यू दरम्यान अनेक महिला पत्रकारांशी ते आक्षेपार्ह कृत्य करायचे. आरोप करणाऱ्या दुसऱ्या एका महिलेने म्हटले आहे की, तेव्हा ती वरिष्ठ पत्रकार होती. अकबर हॉटेलच्या रूम्समध्ये इंटरव्ह्यू करायचे आणि महिलांना बेड शेअर करण्याची आणि दारुची ऑफर द्यायचे. 


वर्षभराने सांगितले नाव.. 
या महिलेने गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये 'टू द हार्वे वेनस्टींस ऑफ द वर्ल्ड' मथळ्याखाली प्रकाशित झालेल्या एका लेखात आरोप केला होता की, 'ते अश्लिल फोन कॉल, टेक्स्ट मॅसेज, नकोसे कौतुक आणि उत्तरात नकार ऐकण्यात एक्सपर्ट आहेत.' महिलेने लिहिले की, अनेक तरुण महिला त्यांच्या कृत्याच्या शिकार ठरल्या आहेत. लेखामध्ये त्यांनी आरोपीचे नाव दिले नव्हते. आता त्यांनी ते एमजे अकबर असल्याचे सांगितले. 


उदित राज यांचे वादग्रस्त वक्तव्य 
भाजप खासदार उदित राज यांनी म्हटले की, महिला आरोप लावण्यासाठी 2-4 लाख घेतात. त्यानंतर त्या इतर पुरुषांना लक्ष्य करतात. सर्व महिला परफेक्ट असतात का? तिचा गैरवापर होऊ शकत नाही का? आरोप लागल्यानंतर एका व्यक्तीचे आयुष्य खराब होते. असे राज म्हणाले. 


नाना पाटेकरांवरील आरोपाने झाली होती सुरुवात 
सर्वात आधी अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकरवर एका चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अभिनेते रजत कपूर, निर्माता-दिग्दर्शक विकास बहल, गायक कैलाश खेर, आलोक नाथ यांच्यावरही असे आरोप झाले आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...