आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MJ Akbar News In Marathi, Senior Journalist In BJP

वरिष्ठ पत्रकार एम. जे. अकबर भाजपमध्ये, निवडणूक लढण्याची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकिकडे बंडखोर नेत्यांची संख्या वाढली आहे तर दुसरीकडे काही नवीन चेहरे निवडणूक रिंगणात उतरताना दिसून येत आहेत. कॉर्पोरेट क्षेत्रातील बॉसेसनाही या निवडणुकीने वेड लावले आहे. आता यात आणखी एक नवीन नाव जोडले गेले आहे. वरिष्ठ पत्रकार एम. जे. अकबर यांचे, त्यांनी आज (शनिवार) भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह यांच्या उपस्थितीत एम. जे. अकबर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीत अकबर भाजपच्या तिकीटावर लढणार असल्याचे समजते. परंतु, अद्याप त्यांचा मतदारसंघ जाहीर करण्यात आलेला नाही.
जाणून घ्या कोण आहेत एम. जे. अकबर...
एम. जे. अकबर यांचे पूर्ण नाव मोबाशार जावेद अकबर असे आहे. त्यांच्या जन्म 11 जानेवारी 1951 मध्ये झाला. त्यांच्या पत्नीचे नाव मल्लीका जोसेफ असून त्यांना प्रयाग आणि मुकुलिका अशी दोन मुले आहेत.
'इंडिया टुडे' या भारतातील सर्वांत मोठ्या मॅगझिनचे ते संपादक संचालक होते. यावेळी त्यांच्याकडे 'हेडलाईन्स टुडे' या वृत्तवाहिनीची जबाबदारीही सोपविण्यात आली होती. 2010 मध्ये त्यांनी 'दी संडे गार्डियन' या वृत्तपत्राची स्थापना केली. त्यांनी 'दी एशियन एज' या वृत्तपत्राचीही स्थापना केली आहे. या वृत्तपत्राचे ते प्रधान संपादक संचालक आहेत.
'बायलाईन', जवाहरलाल नेहरू यांची ऑटोबायोग्राफी 'नेहरूः दी मेकिंग ऑफ इंडिया', काश्मिरवर लिहिलेले पुस्तक 'काश्मिरः बिहाईंड दी व्हॅली, रायट आफ्टर रायट अॅण्ड इंडियाः दी सगा विदइन', जेहादवरील 'दी शेड ऑफ सॉर्ड' आदी नॉनफिक्शन पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.
'ब्लड ब्रदर्स' या त्यांच्या पुस्तकाचा इटालियन भाषेत अनुवाद करण्यात आला आहे.