आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार आदित्य ठाकरे, अण्णां हजारेंच्या सुरक्षेत वाढ; सचिन तेंडुलकर, नारायण राणे, एकनाथ खडसेंच्या संरक्षणात कपात

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आमदार पुत्र आदित्य ठाकरे यांची वाय दर्जाची सुरक्षा आता वाढवून वाय प्लस करण्यात आली आहे. तर समाजसेवक अण्णा हजारे यांची सुरक्षा वाय प्लस वरून झेड करण्यात आली. दुसरीकडे क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यासह खासदार नारायण राणे, आशिष शेलार, राम शिंदे, प्रसाद लाड, एकनाथ खडसे या भाजप नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात अाली. उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्या सुरक्षेतही कपात करण्यात आली आहे.

राज्य आणि केंद्र सरकारतर्फे मंत्री, आमदार, खासदार, खेळाडू, कलाकार, समाजसेवक, उद्योगपती आणि राज्यातील महत्वाच्या व्यक्तींना सुरक्षा प्रदान केली जाते. या सुरक्षेचा आढावा घेणारी एक समिती असून यात मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्य सचिव गृह संजय कुमार,डीजीपी सुबोधकुमार जैसवाल, राज्य गुप्तचर विभाग आयुक्त रश्मी शु्क्ला आणि मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांचा समावेश अाहे. ही समिती दर तीन महिन्याला सुरक्षेचा आढावा घेते व संबंधित व्यक्तीच्या सुरक्षेत वाढ किंवा कपात करण्याचा निर्णय घेतले. या समितीची नुकतीच एक बैठक झाली ज्यात राज्यातील ९७ व्यक्तींच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. यात २९ व्यक्तींच्या सुरक्षा श्रेणीत वाढ वा कपात करण्यात आली तर १६ व्यक्तींना श्रेणीबाह्य करण्यात आले.

क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची एक्स श्रेणीची सुरक्षा काढून घेतली असून अाता त्यांना फक्त पाेलिस एस्कॉर्ट सेवा मिळणार आहे. म्हणजेच तो आता जेव्हा बाहेर जाईल तेव्हा त्याच्यासोबत पोलिस असतील. आदित्य ठाकरे यांची वाय श्रेणीची सुरक्षा फडणवीस सरकारने 'वाय प्लस' अशी वाढवली हाेती. ती वाढवून 'झेड' करण्यात अाली. एकनाथ खडसेंना असलेली 'एक्स' सुरक्षा काढून टाकण्यात अाली.


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व अजित पवार यांची अनुक्रमे झेड प्लस आणि झेड श्रेणीची सुरक्षा कायम ठेवण्यात आली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची वाय प्लस सुरक्षेची श्रेणी वाढवून 'झेड' केली. २०१५ मध्येही अण्णांना सरकारने झेड दर्जाची सुरक्षा देऊ केली होती परंतु त्यांनी ती नाकारली होती.
उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांची 'झेड प्लस' श्रेणी कमी करून 'एक्स', तर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना असलेली झेड प्लस श्रेणीची सुरक्षा 'वाय' श्रेणीवर आणण्यात आली आहे.

कशी असते सुरक्षा श्रेणीची रचना?

  • झेड प्लस : सर्वात उच्च दर्जाची सुरक्षा. माजी पंतप्रधान, उपराष्ट्रपती, माजी केंद्रीय मंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री, कलाकार, खेळाडू, महत्त्वाचे नेते आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना ही सुरक्षा असते. यात ३६ सुरक्षा कर्मचारी असतात, एनएसजीचे १० आणि १० एसपीजीचे कमांडो, एस्कॉर्ट, पायलट वाहन आणि कोब्रा कमांडो, १२ होमगार्ड असतात. पहिला घेरा हा एनएसजी, दुसरा एसपीजीचा असतो व त्यांच्याकडे एमपी ५ गन आणि आधुनिक गॅजेट्स असतात.
  • झेड : ही दुसऱ्या क्रमांकाची सुरक्षा श्रेणी. यात २२ सुरक्षा कर्मचारी असतात. पाच एनएसजी आणि पाच इंडोतिबेटियन बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) असतात. सीआरपीएफ, पायलट वाहन आणि एस्कॉर्ट सेवा असते. यांच्यासोबत स्थानिक पोलिस अधिकारीही.
  • वाय : ११ सुरक्षा अधिकारी, दोन कमांडोचा समावेश असतो. एक व्यक्तिगत सुरक्षा अधिकारीही असतो.
  • एक्स : दोन सुरक्षा रक्षक, व्यक्तिगत सुरक्षा अधिकारी.