आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार स्वत:च वाटताहेत पोलचिट; देशमुखांचा कार्यकर्त्यांवर विश्वास नसल्याचे भाजपचे टोमणे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूरमध्ये काँग्रेस उमेदवार अमित देशमुख  पोलचिट वाटप करताना. - Divya Marathi
लातूरमध्ये काँग्रेस उमेदवार अमित देशमुख पोलचिट वाटप करताना.

लातूर - लातूरमध्ये काँग्रेस उमेदवार अमित देशमुख स्वत:च मतदारांना पोलचिट वाटप करीत असून त्यांनी या माध्यमातून मतदारांशी थेट संपर्क करीत असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे भाजपने यावरून चिमटे घेत अमित देशमुखांकडे पोलचिट वाटप करायलाही कार्यकर्ते उरलेले नाहीत आणि जे आहेत त्यांच्यावर अमित देशमुखांचा विश्वास नसल्यामुळेच ते स्वत: पोलचिट वाटप करीत असल्याचे म्हटले आहे.  

निवडणूक म्हटली की, पोलचिट वाटणे ही पारंपरिक पद्धत एका बाजूला मतदाराचे नाव, त्याचा मतदार यादीतील क्रमांक, मतदान केंद्राचा पत्ता आणि दुसऱ्या बाजूला उमेदवाराचे नाव, चिन्ह, छायाचित्र असे या पोलचिटचे स्वरूप असते. अनेक मतदारांना तर पोलचिट आल्याशिवाय मतदानाला जायची सवयच नसते. त्यामुळे पोलचिट वाटप करणे हे सर्वच प्रमुख पक्षांच्या प्रचाराचा मुख्य कार्यक्रम असतो. लातूरमध्ये सध्या या पोलचिट चर्चेचा मुद्दा ठरला आहे.

लातूर शहर मतदारसंघ ओळखला जातो तो विलासराव देशमुख यांच्यामुळे. दिवंगत विलासरावांचे चिरंजीव अमित यांनी दोन वेळा लातूरची आमदारकी भूषवली असून तिसऱ्यांदा संधी मिळावी या अपेक्षेने ते रिंगणात उतरले आहेत. प्रचाराच्या दरम्यान त्यांनी स्वत:च पोलचिट वाटप करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे काँग्रेसने आमचे उमेदवार मतदारांशी थेट संपर्क करीत असल्याचे म्हटले आहे, तर भाजपने यावर राजकीय चिमटे घेतले आहेत. अमित यांच्यामागे कार्यकर्त्यांची फळीच उरलेली नाही. काँग्रेसमध्ये सगळेच नेते आहेत, कार्यकर्तेच नाहीत. आणि जे उरलेत त्यांच्यावर अमित देशमुखांचा विश्वास नाही, असे म्हणत भाजपने चिमटे काढले आहेत.

बातम्या आणखी आहेत...