आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियावरील कमेंट महागात, महिलांविषयक अश्लील व भडकवणारी पाेस्ट केल्याप्रकरणी आमदार गोटेंवर गुन्हा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- फेसबुक आणि व्हाॅट्सअॅप ग्रुपवर कमेंट करणे आमदार अनिल गाेटे यांना चांगलेच महागात पडले. त्यांच्याविरुद्ध शहर पाेलिस ठाण्यात महिलांविषयक अश्लील व भडकवणारी पाेस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. 

 

पत्रकार याेगेंद्र पूनमचंद जुनागडे यांनी पाेलिसात तक्रार दिली आहे. जुनागडे यांनी सामाजिक व राजकीय विषयांवर वृत्तपत्रात भाष्य केले हाेते. त्यावर प्रतिक्रिया म्हणून आमदार गाेटे यांनी फेसबुक व व्हाॅट्सअॅप ग्रुपवर एक कमेंट टाकली. ती अनेकांनी वाचली. तसेच तीच पाेस्ट आमदार गाेटे यांच्या माेबाइल क्र. ९४२१८८३३६६ वरून याेगेंद्र जुनागडे यांच्या माेबाइलवरील व्हाॅट्सअॅप ग्रुपवरही पाठवण्यात आली. या पाेस्टमध्ये महिलांबद्दल अश्लील, भडकावणारे व लैंगिक विषयक मजकूर हाेता. अशा प्रकारची पाेस्ट टाकून आमदारांनी अशाेभनीय वर्तन केल्याचे जुनागडे यांनी पाेलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. त्यावरून गाेटे यांच्याविरुद्ध शहर पाेलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बातम्या आणखी आहेत...