आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मोदी आपसे बैर नहीं, भामरे तुम्हारी खैर नहीं'; धुळ्यातून आमदार अनिल गोटेंची निवडणूक रिंगणात उडी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- 'मोदी आपसे बैर नहीं, डॉ. भामरे तुम्हारी खैर नहीं', असे आव्हान देतच आमदार अनिल गोटे यांनी लोकसभेच्या रिंगणात उडी घ्यायची तयारी केली आहे. धुळे मतदारसंघाला टक्केवारी, गुंडगिरी व गटबाजीचा लागलेला कॅन्सर मुळापासून उखडून फेकण्यासाठी आपली उमेदवारी राहील, असे गोटे यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले.

 

सध्या या मतदारसंघातून केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हे भाजपचे प्रतिनिधित्व करतात. मात्र धुळे मनपा निवडणुकीपासून भामरे व गोटे यांच्यात वितुष्ट निर्माण झाले आहे. त्यामुळे गोटेंनी आपल्याच पक्षाविरोधात स्वतंत्र आघाडी स्थापन करून मनपा निवडणूक लढवली, मात्र त्यांचा सपशेल पराभव झाला. तेव्हापासून गोटे- भामरेतील वैर आणखीच पेटले आहे. आता ते थेट भामरेंविरोधात निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...