आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आमदार हरवले आहेत! माजी आमदाराने पोलिसांत दाखल केली तक्रार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे - शहापूर पोलिस स्टेशनमध्ये चक्क आमदार हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. शहापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दौलत दरोडा बेपत्त असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवसेनेचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी ही तक्रार दाखल केली आहे. आज दिवसभर घडत असलेल्या राजकीय नाट्याला नवीन वळण आले आहे. शहापूर पोलिसांत माजी आमदारांनी विद्यमान आमदार बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दौलत दरोडा यांच्याशी संपर्क होत नसल्याचे त्यांचा मुलगा करन दरोडा यांनी माध्यमांसमोर सांगितले होते. यानंतर शहापूरचे शिवसेनेचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी शहापूरचे आमदार मतदारसंघातून हरवल्याची तक्रार पोलिसांत दिली आहे. 

बातम्या आणखी आहेत...