आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
यावल- तालुका दुष्काळग्रस्त असून ग्रामीण भागातील पाणी टंचाई संदर्भातील प्रत्यक्ष आराखड्याच्या बाबतीत तुम्हाला जर बैठकीत योग्य उत्तर देत येता नसतील तर तुम्ही प्रत्येक्षात काम कसे करतात? आरखडा सादर करताना कूपनलिकेचे २०० फुटापर्यंत प्रस्ताव तुम्ही पाठवले. मात्र, प्रत्यक्षात मंत्रीमहोदयांनी ४०० फूट वर पाणी लागेल म्हणून चारशे फुटला मान्यता दिली आहे. एवढं तुम्हाला समजत नाही का ? अशा शब्दात चोपडा आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी ग्रामीण पाणीपुरवठाच्या अधिकाऱ्यांना शिवसेना स्टाईलमध्ये शेलकी भाषेत खडे बोल सुनावले. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देखील अधिकाऱ्यांना देता येत नव्हती. शनिवारी सर्व विभागाच्या आढावा समितीच्या बैठकीत तहसील कार्यालयात ते बोलत होते.
येथील तहसिल कार्यालयात शनिवारी चोपड्याचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी सर्व विभागाची आढावा बैठक घेतली होती, त्यात त्यांना तालुक्यात सध्या दुष्काळ असल्याने पाणी टंचाई संर्दभात ग्रामिण पाणी पुरवठा विभागाच्या उपअभियंता एस. एम. मोरे यांच्या कडून तालुक्यातील सध्याच्या टंचाई संर्दभातील आराखडा कसा आहे या बाबत माहिती विचारली असता, मोरे यांनी सहा गावात ७ कुपनलिका व एकेक विहिर खोलीकरण मंजुर असल्याचे सांगितले. तेव्हा आमदार प्रा. सोनवणे यांनी या गावात आराखडा तयार करतांना कशा प्रकारे निकश लावले? गावात पाण्याची स्थिती कशी? गावात ही कामे कधी सुरू होतील? अशी माहिती विचारली असता मोरे यांना उत्तरं देता आली नाही तेव्हा आमदारांनी त्यांचा चांगलाचं समाचार घेतला व दुष्काळ असल्याने काम लवकर सुरू का झाले नाहीत हे विचारले? तालुक्यात अजुन कोणत्या पेयजल योजना सुरू आहेत व त्यांची सध्याची स्थिती काय? यावर देखील अधिकारी मोरे निरूत्तर होते. जे कुपनलिकेचे प्रस्ताव पाठवले ते देखील मोरे यांनी २०० फुट पर्यंतचे पाठवले तेव्हा २०० फुटावर पाणी तरी लागेल का? असा प्रश्न आमदारांनी केला तेव्हा जर २०० फुटावर पाणी लागणारचं नाही तेव्हा तुम्ही असे प्रस्ताव पाठवताचं कशा साठी ? असा संतप्त सवाल त्यांनी केला व मंत्रीमहोदयांनी ४०० फुटाची परवानगी दिली आहे याची साधी माहिती तुम्हाला नाही का ? असा सवाल केला तर दुष्काळात पाणी टंचाईची कामे या महिन्या अखेर पुर्ण करण्याच्या सुचना व विहिर अधिग्रहन आवश्यक्ता असल्यास त्याचे नियोजन करण्याचे त्यांनी सांगीतले.
यांची होती उपस्थिती.
या बैठकीत तहसिदार कुंदन हिरे, पोलिस निरिक्षक डी.के. परदेशी, गटविकास अधिकारी किशोर सपकाळे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुनिल चौधरी, विद्युत वितरणचे उपअभियंता दिलीप मराठे, लागवड अधिकारी प्रज्ञा वडमारे, एसटी आगाराचे एस. व्ही. भालेराव, सुर्यभान पाटील,सेनेचे शहराध्यक्ष जगदिश कवडीवाले, शरद कोळी, गोटू सोनवणे, आदिवासी सेेना प्रमुख हूसेन तडवी, सह मोठ्या संख्येत पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.