आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपमध्ये प्रवेशाची चर्चा असताना आमदार बबनराव शिंदे म्हणतात, जय श्री राम; कॅमेरा ऑन असल्याचे पाहताच म्हणाले, जय भारत!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माढा - आमदार बबनराव शिंदे भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना जिल्ह्यात ऊत आला आहे. पक्षांतराच्या सुरू असलेल्या चर्चा निरर्थक असल्याचे शिंदे यांनी सांगितले असले तरी त्या पार्श्वभूमीवर माढ्यातील पत्रकारांनी त्यांना आता 'जय श्रीराम' का ? असे म्हटले असता आमदार शिंदे यांनी देखील 'जय श्रीराम' म्हणण्याबरोबरच 'जय महाराष्ट्र' असे सुचक वक्तव्य करीत प्रत्युत्तर दिले. त्यामुळे आमदार शिंदे यांच्या वक्तव्याची राजकीय गोटात चर्चा तर होणार हे निश्चित. पत्रकारांचा कॅमेरा सुरु आहे हे पाहिल्यानंतर त्यांनी उशीरा 'जय भारत' ही म्हणून टाकले. शेवटी 'याला अजून वेळ आहे' असे म्हणायलाही ते शेवटी विसरले नाहीत. एवढे झाल्यानंतर मी राष्ट्रवादी सोबतच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

माढेश्वरी अर्बन बँक व कर्मचारी सांस्कृतिक मंडळाने संत श्री संत ज्ञानराज माऊली पायी दिंडी सोहळ्यातील वारक-यांच्या अन्नदानाची व्यवस्था शुक्रवारी माढ्यात करण्यात आली. या पालखी सोहळ्याचे स्वागत व विधीवत महापुजा आमदार बबनराव शिंदे यांच्या हस्ते झाली. त्यानंतर पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला.

 

कृष्णा भिमा स्थिरीकरण योजनेविषयी "मोहिते पाटील त्यांचं ते बघतील की" असे म्हणत कृष्णा भिमा स्थिरीकरण प्रकल्पाचे बाबतीत विधीमंडळात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिलेले उत्तर मला माहिती आहे असे सांगत यावर अधिक न बोलता त्यांनी चुप्पी साधली. मोहिते पाटील यांनी अद्याप भाजपात प्रवेश केलेला नाही. ते राष्ट्रवादीकडे पुन्हा वळतील काय असे विचारले असता पक्ष श्रेष्ठी तो निर्णय घेतील. मी पक्षाचा मोठा नेता नाही असे ते म्हणाले.


मोहिते पाटील व रणजितसिंह निंबाळकर यांनी कृष्णा भीमा स्थिरिकरण योजनेच्या मुद्द्यावर माढा लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र आता तीच योजना होणे अशक्य असल्याचे मंत्री गिरिश महाजन यांनी म्हटले आहे. ही जनतेची दिशाभूल समजायची का? या प्रश्नांकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता आमदार बबनराव शिंदे यांनी उत्तर देताना सावध पवित्रा घेत या प्रश्नाला त्यांनी दुजोरा देत कानडोळा करीत पत्रकारांनाच कॅमेरा बंद करण्याचा सल्ला दिला.


मी राष्ट्रवादी काँग्रेसचाच आहे
येऊ घातलेली विधानसभेची माढ्याची निवडणूक सहाव्यांदा मीच राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार म्हणून लढविणार असल्याचे ठासून सांगत मी याही वेळेस असल्यामुळे या ठिकाणी इतर कोणाचा विषयच येत नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेसचाच आहे आणी यापुढे मी सोबत राहीन असेही शिंदे म्हणाले.


जिल्ह्यातील निम्मे कारखाने बंद ठेवावे लागतील
सध्याच्या स्थितीत अडसाली ऊसाचा मोठ्या प्रमाणावर जनावरांच्या वैरणीसाठी वापर होतो आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्याना ऊसाच्या टंचाईस सामोरे जावे लागणार असून जिल्ह्यातील निम्मे  कारखाने बंद ठेवण्याची परिस्थिती निर्माण होणार असल्याचे त्यांनी म्हटले.