Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | MLA Balasaheb Murkute's slander on social media; complaint filed against three people 

आमदार बाळासाहेब मुरकुटेंची सोशल मीडियावर बदनामी; तिघांविरुद्ध गुन्हा 

प्रतिनिधी | Update - Jan 14, 2019, 10:46 AM IST

११ जानेवारीपासून मुरकुटेंविषयीचा मजकूर सोशल मीडियावर व्हायरल होत होता.

  • MLA Balasaheb Murkute's slander on social media; complaint filed against three people 

    नेवासे- नेवाशाचे भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे राष्ट्रवादीच्या वाटेवर, माजी आमदार चंद्रशेखर घुले, अजित पवार आणि आमदार मुरकुटे यांची पुण्यात गुप्त बैठक अशी बातमी व घुले हे आमदार मुरकुटे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत असल्याचा फोटो सोशल मीडियावर टाकणाऱ्या तिघांविरुद्ध मुरकुटे यांचे स्वीय सहायक सुनील बाळासाहेब मोरे यांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर खोटा व बदनामीचा मजकूर प्रसिद्ध केल्याबद्दल संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

    मुरकुटे व गडाख गटातील कार्यकर्ते एकमेकांच्या नेत्यांची व पक्षाची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर मागील काही दिवसांपासून करत आहेत. त्याची परिणीती रविवारी गुन्हा नोंदवण्यात झाली. ११ जानेवारीपासून मुरकुटेंविषयीचा मजकूर सोशल मीडियावर व्हायरल होत होता. सकाळी साडेअकरा वाजता सुनील मोरे यांना त्यांच्या मोबाइलवर यश दरंदले, महेश उगले, सुनील जाधव यांनी वेगवेगळ्या फेसबुक पेजवर व व्हॉचसअप ग्रुपवर प्रसिद्ध केलेला हा मजकूर आढळला. त्यांनी लगेच नेवासे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. जाणीवपूर्वक अाक्षेपार्ह मजकूर प्रसारित करून आमदार मुरकुटे यांची बदनामी केल्याने कायदेशीर कारवाई व्हावी, असे मोरे यांनी तक्रारीत नमूद केले होते. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या मजकुराबद्दल आमदार मुरकुटे यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, मला पक्ष बदलण्याची गरज नाही. विरोधकांनी माझ्याविरूध्द षडयंत्र रचण्यापेक्षा या वेळी कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची हे ठरवावे. आतापर्यंत १७ निवडणुकीत त्यांनी १७ पक्ष बदलेले आहेत.

Trending