आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजित पवार गटनेते, त्यांनी सांगितले म्हणून राजभवनावर गेलो 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवारी सकाळी शपथविधीच्या वेळेस अजित पवार यांच्यासोबत दौलत दरोडा (शहापूर, ठाणे), नरहरी झिरवळ (दिंडोरी, नाशिक), सुनील भुसारा (विक्रमगड, पालघर), दिलीप बनकर (निफाड, नाशिक), अनिल भाईदास पाटील (अमळनेर), नितीन पवार (कळवण, नाशिक), सुनील शेळके (मावळ, पुणे), बाबासाहेब पाटील (अहमदपूर, लातूर), संदीप क्षीरसागर (बीड), डॉ. राजेंद्र शिंगणे (सिंदखेड राजा) आणि संजय बनसोड (उदगीर, लातूर) होते. नंतर भुसारा, दिलीप बनकर, सुनील शेळके आणि संजय बनसोड, संदीप क्षीरसागर आणि डॉ. शिंगणे पुन्हा राष्ट्रवादीत परतले असल्याने भाजपकडे बहुमतासाठी पुरेसे संख्याबळ नाही.

दिलीप बनकर, आमदार निफाड (जि. नाशिक)
 
मी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच आहे. अजित पवार हे गटनेते असल्याने त्यांच्या सांगण्यावरून मी राजभवनात गेलो होतो. तिथे काय होणार आहे याबाबत कोणतीही कल्पना नव्हती. मी पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात नाही!

माणिकराव कोकाटे, सिन्नर (जि. नाशिक)
 
मी पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात नाही.अजितदादा गटनेते असल्याने त्यांचा आदेश पाळला. राजभवनात काय होणार आहे, हे माहीत नव्हते. मी पक्षासोबतच आहे. एकदा घेतलेला निर्णय कदापिही बदलणार नाही!

डॉ. राजेंद्र शिंगणे, सिंदखेड राजा (बुलडाणा)


अजितदादांनी रात्री फाेन करून सकाळी धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बाेलावले. तेथून काहीही न सांगता थेट राजभवनवर नेण्यात आले. काही वेळेनंतर तिथे देवेंद्र फडणवीस आले. यानंतर लगेच शपथविधी झाला.

संदीप क्षीरसागर, बीड


काय घडतंय याची आम्हाला कल्पनाच नव्हती. अजित पवारांच्या शपथविधीनंतर आम्ही तडक शरद पवारांकडे गेलो. मी राष्ट्रवादीबरोबर आहे. गैरसमज आणि गटनेत्याचा फोन आला म्हणून तिकडे गेलो.

आमदार सुनील भुसारा विक्रमगड


दादांनी फोन केल्याने राजभवनावर गेलो. शपथविधीनंतर आम्ही पवार साहेबांकडे परतलो. काय घडतंय याची माहिती नाही. राजभवनात जे तिथे होते त्यांना काही माहीत नव्हते. तिथे आमचा रक्तदाब वाढला होता.

आमदार सुनील शेळके, मावळ


राजभवनावरील घडामोडींची आम्हाला कल्पना नव्हती. सुप्रियाताईंचे स्टेटस पाहिल्यानंतर काय घडलंय याची कल्पना आली. यानंतर शरद पवार यांच्याशी संवाद साधला . मी पक्षाशी प्रामाणिक आहे.
 

बातम्या आणखी आहेत...