आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानच्या शेरापेक्षा कमी नाही शिवसेना आमदारांचा हा Bodygaurd, हाताने अडवली तलवार; जीवाची बाजी लावून असे वाचवले...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शिवसेना आमदार तुकाराम काते यांच्या दुर्गा पंडालमध्ये जीवघेणा हल्ला झाला. अचानक झालेल्या हल्ल्यातून ते बालंबाल बचावले आहेत. त्यांच्यावर तलवारीने वार करून हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात कातेंना काही जखमा झाल्या तरीही त्यांचा जीव वाचला. याचे संपूर्ण श्रेय त्यांच्या अंगरक्षकाला जाते. घटनास्थळी उपस्थित राहिलेला त्यांचा अंगरक्षक यात गंभीर जखमी झाला आहे. यासोबत त्यांचे दोन कार्यकर्ते देखील जखमी झाले. मानखुर्द गोवंडी परिसरात शुक्रवारी संध्याकाळी शिवसेना आमदार काते दुर्गा पंडालमध्ये आरती करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी त्यांच्यावर हल्ला झाला. 


आमदारांनीही केले कौतुक
शिवसेना आमदार काते यांनी आपल्यावर झालेल्या हल्ल्यासाठी एमएमआरडीएच्या कंत्राटदारांना जबाबदार धरले आहे. त्यांनीच आपल्या नावाची सुपारी देऊन हा हल्ला घडवला असे ते म्हणाले. हल्ला झाला त्यावेळी बॉडिगार्ड आणि कार्यकर्त्यांनी जीव वाचवला असेही ते पुढे म्हणाले. "हल्लेखोर तलवार आणि चॉपर घेऊन आले होते. त्यांनी तलवारीने थेट माझ्यावर वार केला होता. परंतु, ऐनवेळी माझ्या अंगरक्षकाने स्वतःचा जीव धोक्यात टाकून तो वार आपल्या हातावर झेलला आणि हातानेच तलवार अडवली. त्यांच्यामुळेच माझा जीव वाचला." असे काते यांनी स्पष्ट केले. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात 5 अज्ञात हल्लेखोरांच्या विरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम 307 आणि आर्म्स अॅक्टसह दंगल भडकावण्याचे आरोप दाखल केले आहेत. घटनास्थळावरून हल्ल्यासाठी वापरलेली तलवार जप्त केली. तसेच काही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...