आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपाच्या खासदाराने केली शो बंद करण्याची मागणी,  करणी सेनाही आक्रमक, म्हणाले- शो  भारतीय संस्कृतीला काळीमा फासणारा 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्कः  भाजपाचे उत्तर प्रदेशातील गाजियाबादच्या लोणीचे खासदार नंदकिशोर गुर्जर यांनी माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून बिग बॉस 13 हा शो बंद करण्याची मागणी केली आहे. हा शो अश्लिल आणि भारतीय संस्कृतीला काळीमा फासणारा असल्याचे गुर्जर यांनी पत्रात म्हटले आहे.

करणी सेनाही आक्रमक... 
पद्मावत, मणिकर्णिका आणि आर्टिकल 15 या चित्रपटानंतर बिग बॉस 13 हा रिअॅलिटी शो करणी सेनेच्या रडारवर आला आहे. करणी सेनेनेही हा शो बंद करण्याची मागणी केली आहे. या शोमधील कंटेंट अतिशय बोल्ड असून हा शो भारतीय संस्कृतीची पायमल्ली करणारा असल्याचे करणी सेनेने म्हटले आहे.


करणी सेनेने प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून हा शो बंद करण्याची मागणी केली आहे. बिग बॉस 13 मध्ये काश्मिरी मुलाबरोबर हिंदू मुलगी बेड शेअर करत आहे. हिंदू मुलींना आधुनिक बनवण्याच्या नावाखाली चुकीची मानसिकता पसरविली जात आहे. हिंदू मुली लग्नाच्या आधी आई बनू शकतात, असानिष्कर्ष यातून निघतो. सरकारने यावर तातडीने निर्णय घेत हा शो त्वरित बंद करावा, असे करणी सेनेने या पत्रात म्हटले आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...