Home | Maharashtra | Vidarva | Akola | MLA fundkar and bjp worker beaten st bus depot manager

खामगावमध्ये आमदारासमक्ष एसटी आगारप्रमुखास कार्यकर्त्यांची मारहाण

प्रतिनिधी, | Update - Jul 11, 2019, 09:34 AM IST

मारहाण करणारे भाजपचे कार्यकर्ते माेकाट, आगार व्यवस्थापक निलंबित

  • MLA fundkar and bjp worker beaten st bus depot manager

    खामगाव - मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये भाजप आमदाराने पालिका अधिकाऱ्याला केलेली मारहाण, काेकणात आमदार नितेश राणे यांनी बांधकाम अभियंत्याला चिखलाची अंघाेळ घालून बांधून टाकल्याचे प्रकरण ताजे असतानाच खामगाव येथे भाजप आमदारासमक्ष एसटी आगार व्यवस्थापकाला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना साेमवारी घडली. विशेष म्हणजे या प्रकरणात आमदाराच्या तक्रारीनंतर महामंडळाने व्यवस्थापकावर मनमानी कारभाराचा ठपका ठेवत त्याला निलंबितही केले आहे.


    आषाढीसाठी खामगाव बसस्थानकातून पंढरपूर वारीसाठी जादा बसेस साेडल्या जातात. साेमवारी वारकरी माेठ्या संख्येने स्थानकावर जमले हाेते, मात्र जादा बसेससाठी त्यांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत हाेती. हा प्रकार कळताच भाजप आमदार आकाश फुंडकर यांनी समर्थकांसह बसस्थानकात धाव घेतली. आगार व्यवस्थापक रितेश फुलपगार यांना बसेस विलंबाबाबत आमदार जाब विचारत असताना त्यांच्या समर्थकांनी फुलपगार यांना मारहाण केली. या वेळी तहसीलदार डॉ. शीतल रसाळ, ठाणेदार संतोष टाले हेही उपस्थित हाेते. दरम्यान, फुलपगार यांच्या नियाेजनशून्य कारभाराची आमदारांनी विभाग नियंत्रकांकडे तक्रार केली. त्यानंतर मंगळवारी तातडीने फुलपगार यांना निलंबित करण्यात आले. मात्र, त्यांना मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. माजी आमदार दिलीप सानंदा यांनी या घटनेचा निषेध करून कारवाईची मागणी केलीे.

Trending