आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शपथविधी दरम्यान आमदार के.सी पाडवींवर संतापले राज्यपाल, पुन्हा शपथ वाचायला लावली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अक्कलकुवाचे काँग्रेस आमदार के. सी. पाडवी यांनी मंत्रिपदाची शपथ घेताना शेवटी ‘मला निवडून दिलेल्या माझ्या मतदारांचा मी आभारी आहे’ अशी ओळ उच्चारली. त्याला राज्यपालांनी आक्षेप घेत ‘ये क्या बोलते हो...ऐसा नही चलेगा...चलो, फिर शपथ लो’ अशी तंबी पाडवींना दिली. पाडवींना पुन्हा नमुन्याबरहुकूम शपथ घ्यायला लावली.  यानंतर राज्यपाल काेश्यारी यांचा राग निवळला. त्यांनी पाडवी यांच्याशी हसत हस्तांदोलन केले. त्यांच्या पाठीवर थापही मारली. यानंतर मात्र शपथ घेणाऱ्या मंत्र्यांनी शपथविधीच्या मायन्याव्यतिरिक्त पुढे-मागे एकही शब्द उच्चारला नाही.  > २८ ऑक्टोबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर इतर तिन्ही पक्षांच्या सहा मंत्र्यांचा मुंबईतील शिवाजी पार्कवर शपथविधी झाला होता. तेव्हाही काही मंत्र्यांनी शपथ घेताना मध्येच पूजनीय नेते व दैवतांची नावे घेतली होती. त्या वेळीही राज्यपाल कोश्यारी हे नाराज झाले होते.