Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | MLA Mete help to BJP in Beed

मेटेंचा ‘संग्राम’ राज्यात महायुतीसाठी, बीडमध्ये मात्र ‘फक्त जय बजरंग!’

प्रतिनिधी | Update - Apr 12, 2019, 09:23 AM IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनवणेंना जाहीर पाठिंबा

 • MLA Mete help to BJP in Beed

  बीड - राज्यात भाजप-शिवसेनेसोबत राहण्याचा निर्णय जाहीर करणारे शिवसंग्राम पक्षाचे नेते आ. विनायक मेटे यांनी बीड लोकसभा मतदारसंघासाठी मात्र भूमिका बदलत या मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या पाठीशी शक्ती उभी करण्याचा निर्णय गुरुवारी जाहीर केला. निष्ठावंतांची फोडाफोडी आणि डावलले जात असल्याची भावना व्यक्त करत “आम्हाला ही लाचारी नको’, अशी गर्जना मेटे यांनी केली. शिवसंग्राम पक्षाच्या येथे आयोजित संघर्ष मेळाव्यात मेटेंनी केलेली ही घोषणा भाजपला धक्का मानला जात आहे. मेटेंची नाराजी प्रामुख्याने बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर आहे.


  दानवेंनी सुनावले तरी... :

  लोकसभा निवडणुकीपूर्वी आ. मेटे यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत बीड जिल्हा वगळता महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी महायुतीसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी “बीड जिल्ह्यात एक आणि राज्यात दुसरा निर्णय’ चालणार नाही, असे औरंगाबाद येथील बूथप्रमुखांच्या मेळाव्यात सुनावले होते. त्यामुळे बीडमध्ये पंधरा दिवसांपासून आ. मेटे यांच्यासह कार्यकर्ते अलिप्त होते. शेवटी आ. मेटे यांनी संघर्ष मेळावा घेऊन कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना पाठिंबा जाहीर केला.

  आमची माणसं गेली ...त्यांच्या रक्तातच गद्दारी होती :

  बीड जिल्ह्यात आम्हाला संपवायचे काम होत आहे. आमची माणसं फुटली. त्यांच्या रक्तातच गद्दारी होती. दुष्काळात आम्ही शेतकऱ्यांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात म्हणून प्रस्ताव दिले. परंतु मुख्यमंत्र्यांनी लेखी आदेश देऊन, चार वेळा फोन करूनही जिल्हाधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी मंजुरी दिली नाही. तुम्ही मुंडे साहेबांच्या वारसदार नाहीत हे इथेच सिद्ध होत असल्याचे आमदार मेटे म्हणाले.

Trending