आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिखलफेक! नितेश राणेंनी कार्यकर्त्यांसह अधिकाऱ्यावर ओतल्या चिखलाच्या बादल्या, रस्त्याच्या दुरावस्थेवर होते संतप्त

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रत्नागिरी - कणकवली शहरातील हायवेवर खड्ड्यांमुळे संतप्त आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी राडा घातला. कार्यकर्त्यांसह त्यांनी हायवे प्रकल्पाचे उप-अभियंता प्रकाश शेडेकर यांचे हात बांधण्याचा प्रयत्न केला. त्यांना गुडघाभर पाण्यातून चालण्यास विवश केले. यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्याच्या अंगावर चिखलाच्या बादल्या ओतल्या. आमदार नितेश राणे यांच्या राड्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना हायवेचे काम कसे व्यवस्थित होत नाही हे पाहण्यासाठी आता छडी घेऊन थांबणार असल्याचे ते म्हणाले आहेत.


कणकवली येथील महामार्गाच्या दुरावस्थेवर संतप्त आमदार नितेश राणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. कारवाई होत नसल्याचे पाहता त्यांनी गुरुवारी सकाळी थेट कार्यालय गाठून संबंधित अधिकाऱ्याला उचलून आणले. महामार्गावरील खड्डे दाखवताना कथितरीत्या चिखलातून चालवले आणि गडनदी पुलावर नेऊन संतापाच्या भरात खूप काही सुनावले. यानंतर अधिकाऱ्याच्या अंगावर चिखलाने भरलेल्या बादल्या ओतण्यात आल्या. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये अधिकारी समजावण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. परंतु, नितेश राणेंचा राग शांत झाला नाही. त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला 15 दिवसांच्या आत कुठल्याही परिस्थितीत सर्व्हिस रोड बनवण्याचा इशारा इशारा दिला.

 

वडिलांनी मागितली माफी, नितीश राणे म्हणतात छडी घेऊन थांबेन

आमदार नितेश राणे यांनी अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरच नव्हे, तर माध्यमांवर सुद्धा लावून धरण्यात आला. यानंतर त्यांचे वडील नारायण राणे यांनी माध्यमांसमोर मुलाच्या कृत्याची माफी मागितली. सोबतच, ते आंदोलन करत होते आणि चिखलाच्या बादल्या स्वतः नितेश यांनी फेकलेल्या नाहीत असा पावित्रा देखील घेतला. परंतु, नितेश राणे यांनी या प्रकरणी माघार घेण्यास स्पष्ट नकार दिला. तसेच यापुढे हायवेचे काम व्यवस्थित कसे होत नाही हे हातात छडी घेऊन पाहणार आहे. असेही नितेश राणे म्हणाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...