आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार प्रणिती शिंदें अडचणीत; काँग्रेसच्या माजी महापौरांनी उमेदवारीला केला विरोध, मुस्लीम उमेदवार देण्याची समाजाची मागणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूरात मिळालेल्या पराभवानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत अनेकांनी बंड पुकारल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळेच काय तर मात्तबर नेता चांगलाच अडचणीत येणार आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आणि सोलापूर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांनी बंड पुकारल्याचे पाहायला मिळत आहे. शहर मध्य मतदार संघात मुस्लीम मतदार जास्त प्रमाणात असल्यामुळे मुस्लीम समाजाचा उमेदवार द्यावा अशी मागणी प्रणिती शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. 


लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघात सुशीलकुमार शिंदेंचा दुसऱ्यांदा पराभव झाला. त्याचाच दुष्परिणाम म्हणून आता स्थानिक नेत्यांनीही विरोधाची भूमिका घेतली आहे. आतापर्यंत शिंदेंचा शब्द खाली पडू न देणारे कार्यकर्ते त्यांच्यावर भलतेच नाराज झाले आहेत. त्यामुळे प्रणिती शिंदेंच्या विरोधात राजकारण सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.


सुशीलकुमार शिंदेंच्या जवळच्या अनेक जणांनी बंडाचे हत्यार घेत, प्रणिती शिंदे यांच्या मतदार संघावर मुस्लीम समाजाचा उमेदवार द्यावा अशी मागणी केली आहे. हा दावा करणारे काँग्रेसचेच माजी महापौर आणि सुशीलकुमार शिंदे यांचे समर्थक यु.एन.बेरिया आहेत. मध्य मतदार संघात एक लाखांपेक्षा जास्त मुस्लीम मतदार आहेत. पण असे असतानाही प्रत्येक वेळेस मुस्लीम समाजाला डावलले जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे यावेळेस आमदार प्रणिती शिंदे यांनी स्वतःहून मतदार संघ सोडावा आणि मुस्लीम समाजाला उमेदवारी देण्याची मागणी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडे करण्यात आली आहे.


एकीकडे मुस्लीम समाजाने आमदार प्रणिती शिंदेच्या शहर मध्यवर दावा केलेला असतानाच मतदार संघातील क्रमांक दोनवर असणाऱ्या आणि काँग्रेसची मोठी वोट बँक असणाऱ्या मोची समाजही उमेदवारी मिळण्यासाठी आग्रहही आहे आहे. त्यासाठी मोची समाजाचे बैठकांचे सत्रही सुरू झाले आहे.


सोलापूर शहरातील विधानसभेच्या 3 जागांपैकी उत्तर भाग हा भाजपाचा बालेकिल्ला बनला आहे, त्यामुळे त्या मतदार संघातून निवडणूक लढवण्याचा प्रश्नच येत नाही. तर दक्षिण मतदार संघात सहकार मंत्री सुभाष देशमुखांनी चांगलेच बस्तान बांधले असल्यामुळे उरलेल्या मध्यच्या जागेवर निवडणूक लढवावी लागणार आहे, पण आता काँग्रेसमधूनच बंडाचा इशारा दिल्यामुळे प्रणिती शिंदेंना कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.