आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम पक्षाला देणार सोडचिठ्ठी, लवकरच करणार या पक्षात प्रवेश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - अण्णाभाऊ साठे महामंडळातील घोटाळ्याप्रकरणी 4 वर्षांपासून तुरुंगवास भोगत असलेले राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. जालना जिल्हा न्यायालयात सुनावणी दरम्यान कदम आले असता त्यांनी याबाबत माहिती दिली. 

रमेश कदम मोहोळ विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी तुरुंगात आहेत. त्यामुळे मतदारसंघाचा विकास झालेला नाही. सत्तेसोबत राहिल्याशिवाय विकास शक्य नाही. म्हणून मी लवकरच सत्ताधारी पक्षात दिसेल, असे मत रमेश कदम यांनी व्यक्त केले.

दरम्यान, त्यांनी शिवसेनेत जाणार की भाजपमध्ये जाणार या प्रश्नाला थेट उत्तर दिले नाही. सत्तेसोबत जाणार इतकंच ते म्हणाले. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळात मला बळीचा बकरा करण्यात आले. त्यामुळे ज्या लोकांनी हे केले ते लवकरच समोर येईल. सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे. त्यात सर्व गोष्टींची शहानिशा होईल, तपासणी होईल. त्यातून खरी वस्तुस्थिती जनतेच्या समोर येईल आणि मला न्याय मिळेल, असेही कदम म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...