आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार शिरिषकुमार नाईकांनी खैरवे धरणाची पाहणी करून शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईची मागणी केली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवापूर- तालुक्यात खैरवे धरणाचा उजव्या कालव्याच्या विमोचक जवळ सकाळी 9 वाजेच्या सुमारास लिक झाले होते. यासंदर्भात गावातील सरपंच व ग्रामस्थांनी संबंधित विभागाचे अधिकारी यांना माहिती दिली तरी देखील अधिकारी आले नाही. त्यामुळे काही वेळात लिक वाढले आणि धरणाला भगदाड पडले. यामुळे आजुबाजूच्या शेतात पाणी शिरल्याने पीक मालाचे मोठे नुकसान झाले. संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या दुर्लक्षामुळे बळीराजाचे नुकसान झाल्याची माहिती आमदार शिरिषकुमार नाईक यांना ग्रामस्थांनी दिली.नवापूर विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार शिरिषकुमार नाईक यांनी खैरवे लघु प्रकल्प व शेतकऱ्यांच्या पीक मालाची पाहणी केली. यावेळी सरपंच रिना दिनेश गावित, उपअभियंता सुभाम गावित, ग्राम पंचायत सदस्य अरुण गावित, हेमंत नाईक, शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी आमदार शिरीष नाईकांच्या भेटीदरम्यान गावकरी व सरपंचांनी अधिकारी वेळेवर आले नसल्याचा आरोप केला असून आम्ही वेळोवेळी तक्रारी केल्यावरही अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही, असे सांगतिले. आमदार शिरीष नाईक यांनी वरिष्ठ अधिकार्याशी चर्चा करून चौकशी करण्याचे आश्वासन दिले असून, यात जो कोणी दोषी असेल त्यावर कारवाई केली जाईल असे सांगितले.आजूबाजूचा शेतात पाणी शिरल्याने पीकमालाचे नुकसान झाले, यावर तत्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. सात जेसीबीद्वारे रात्री उशिरापर्यंत भर पावसात काम करत गळती बंद करण्यात जलसंपदा विभागाला यश आले आहे. खैरवे धरण फुटल्याचा अफवाने नवापूर तालुक्यातील चिमणीपाडा, आसलीपाडा, आंबाफळी, बोरचक, शेगवे गावातील ग्रामस्थ भयभीत झाले होते. काहीनी रात्र जागून काढली तर काही ग्रामस्थ भीतीने टेकडीवर गेले होते. रात्री उशीरापर्यंत धरणाची दुरूस्ती करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...