आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार शिवाजी कर्डिलेंनी दिली होती जीवे मारण्याची धमकी...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नगर : आमदार शिवाजी कर्डिले यांनी पिस्तूल रोखत डॉ. प्रकाश कांकरिया व मला जीवे मारण्याची धमकी दिली होती, अशी साक्ष प्रत्यक्षदर्शी मिलिंद मोभारकर यांनी न्यायालयात दिली. नगर तालुक्यातील बुऱ्हाणनगर हद्दीतील जमिनीच्या व्यवहारातील ९२ लाख रुपये परत मागितल्याने कर्डिले यांनी ही धमकी दिल्याचे मोभारकर यांनी सोमवारी न्यायालयासमोर सांगितले. 


बुऱ्हाणनगर हद्दीतील २३ एकर जमिनीच्या व्यवहारात डॉ. कांकरिया यांची ९२ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात आमदार कर्डिले यांच्या विरोधात २०११ मध्ये गुन्हा दाखल आहे. या खटल्याची सुनावणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर सुरू आहे. साक्षीदार मोभारकर यांची साक्ष सोमवारी नोंदवण्यात आली. कांकरिया यांना बुऱ्हाणनगर हद्दीतील २३ एकर जमीन खरेदी करायची होती. आमदार कर्डिले व कांकरिया यांच्या व्यवहाराची बोलणी झाली होती. जमिनीचे साठेखत झाले होते, त्याचे ९२ लाख रुपये कांकरिया यांनी कर्डिले यांना दिले होते. मात्र, ही जमीन डॉ. रावसाहेब अनभुले यांना विकण्यात आली. त्यामुळे कांकरिया यांनी ९२ लाख रुपये परत मागितले. कर्डिले यांनी कांकरिया यांना बंगल्यावर पैसे घेण्यासाठी बोलावले होते. त्यानुसार कांकरिया व मोभारकर हे कर्डिले यांच्या बंगल्यावर गेले. परंतु कर्डिले यांनी पैसे देण्याऐवजी पिस्तूल रोखत कांकरिया व मला जीवे मारण्याची धमकी दिली, अशी साक्ष मोभारकर यांनी न्यायालयासमोर दिली. 

बातम्या आणखी आहेत...