आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तानाजी' चित्रपट करमुक्‍त करुन वीर योद्ध्याला मानवंदना द्यावी, आमदार सुधीर मुनगंटीवारांची मागणी

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • 'तानाजी: द अनसंग वॉरियर' चित्रपट आजच्‍या पिढीसाठी प्रेरणादायी असा आहे

मुंबई-  हिंदवी स्‍वराज्‍याचे संस्‍थापक, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे खंदे सेनापती तानाजी मालुसरे यांच्‍या जीवनावर आधारीत 'तानाजी: द अनसंग वॉरियर' या चित्रपटाला करमुक्‍त करण्‍याची मागणी माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.


नुकतच छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट 'तानाजी: द अनसंग वॉरियर' प्रदर्शित झाला आहे. शिवाजी महाराज आणि त्यांच्या इतिहासाची पाने उलगडणारा चित्रपट महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. तानाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे घनिष्‍ठ मित्र आणि वीर निष्‍ठावान मराठा सरदार होते. तानाजी सारख्‍या वीर योध्‍द्याच्‍या जीवनावर प्रकाशझोत टाकणारा हा चित्रपट आजच्‍या पिढीसाठी प्रेरणादायी असा आहे.


"आधी लगीन कोंडाण्‍याचे मग रायबाचे..." असे म्‍हणत युध्‍दाला सामोरे जाणारे तानाजी आमच्‍या श्रेष्‍ठ मराठी संस्‍कृतीचा मानबिंदु आहे. या चित्रपटाला रसिकप्रेक्षकांची प्रचंड पसंती सुध्‍दा मिळत आहे. या चित्रपटाला करमुक्‍त करुन शासनाने या वीर योध्‍द्याला मानवंदना द्यावी अशी मागणी आ. मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे व अर्थमंत्री अजित पवार यांच्‍याकडे केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...