आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • MLA Suresh Dhas's Son Filed An Independent Application For Assembly Election For Shirur patoda ashti Constituency

आमदार सुरेश धस यांच्या मुलाने भरला अपक्ष अर्ज, भाजपचे अधिकृत उमेदवार भिमराव धोंडेंना धस गटाचा विरोध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- भाजपकडून विधान परिषदेवर निवडणूक गेलेले आमदार सुरेश धस यांचे सुपूत्र जयदत्त धस यांनी उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जयदत्त यांनी आष्टी-पाटोदा-शिरुर मतदारसंघासाठी आपला अपक्ष अर्ज दाखल केला. या मतदारसंघातून भाजप-शिवसेना युतीकडून भाजपचे भिमराव धोंडे अधिकृत उमेदवार आहेत. आता जयदत्त यांच्या अर्जामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.



सुरेश धस यांचे पूत्र मागील काही वर्षांपासून मतदारसंघात गाठीभेटी घेत आहेत. पक्षाकडून उमेदवारी मिळण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. पण, पुन्हा एकदा भिमराव धोंडे यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, मतदारसंघात धोंडे यांना विरोध असल्याने दुसरा उमेदवार द्यावा, असे धस यांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. एकीकडे, सुरेश धस यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या रॅलीलाही उपस्थिती लावली, तर दुसरीकडे मुलाने अपक्ष अर्ज दाखल केला. त्यामुळे पंकजा मुंडे याबाबतीत काय निर्णय घेतात ते पाहणे महत्त्वाचे आहे.