आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आमदारांचे अशोभनीय वर्तन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधान भवनात झालेला प्रकार निंदनीय असाच म्हणावा लागेल. लोकप्रतिनिधी हे जनतेचे आणि पोलिस हे कायद्याचे रक्षक. त्यामुळे पोलिस अधिकार्‍यांना झालेली मारहाण समर्थनीय नाही. संसद, राजभवन, विधान भवन, लोकसभा आणि राज्यसभा यांना काही इतिहास आहे, संस्कृती, पवित्रता आहे, परंपरा आहे हेच राज्यकर्ते विसरू लागले आहेत. गेल्या काही वर्षांत राजकारणात मद येऊ लागला आहे. पैशाची ताकद सर्वकाही करू शकते. त्यामुळे काम करून घेण्यासाठी दहशतीचा वापर वाढत आहे. अशाने राज्यात अनेक मतदारसंघांत बाहुबलींचे राज्य तयार झाले आहे. निकोप लोकशाहीसाठी ही घातक घटना आहे. महारााचा नैतिक, अभ्यासू, वैचारिक, लोकहितकारक वारसा कमी होत चालला आहे, ही चिंतेची बाब वाटते.