आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीसीसी बँकेत 400 कोटींपेक्षा अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचे आरोप, आमदार मेटेंकडून कारवाईची मागणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - डीसीसी बँकेत 400 ते 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आमदार विनायक मेटे यांनी केला आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात कारवाईची मागणी केली. 'जानेवारी महिन्यात बीड जिल्हा बँकेतून वसुली टक्का देण्यात यावा यासाठी गट सचिवांनी आंदोलन छेडले होते. सेवा सहकारी सोसायटीमार्फत शेतकऱ्यांना डीसीसी बँकेने वाटप केलेले कर्ज शेतकऱ्यांनी परत भरले. मात्र सदरील रक्कम बँकेत जमा केलेली नाही. अर्थातच बँकेमध्ये शेतकऱ्यांच्या नावे थकीत कर्जाची रक्कम तशीच त्यांच्या नावावर दिसत होती. त्यामुळे हजारो शेतकरी कर्जबाजारी झाले. या सर्व मंडळींचा दुष्ट हेतू सरळ आणि स्पष्ट होता, की शेतकऱ्यांच्या नावावर असलेले कर्ज हे कर्जमाफीमध्ये येणार, शेतकऱ्यांचे थकीत कर्ज शासन माफ करणार आहे. असा दावा मेटे यांनी केला.

विधान परिषदेत मुद्दा उपस्थित कराणार -मेटे
मेटे पुढे म्हणाले, दुर्दैव असे आहे कि आपल्या जिल्ह्यामध्ये हजारो शेतकऱ्यांनी थोड्या थोड्या कर्जामुळे आत्महत्या केलेल्या आहेत. स्वतःच्या मरणाला कर्जबाजारीपणामुळे कवटाळणारे आपले गोरगरीब शेतकरी असताना शेतकऱ्यांच्या टाळूवरील लोणी खाणारे हे लोक माणुसकीला काळिमा फासणारे आहेत. म्हणून या सर्वच आरोपींवर एफआयआर दाखल करावा, त्यांना अटक करून त्यांच्याकडून पैसे वसूल करण्यात यावे अशी मागणी सुद्धा यावेळी बोलताना मेटे यांनी केली. विनायक मेटे यांनी सांगितल्याप्रमाणे, 'बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळी पार्श्वभूमीवर जी टँकर लावली होती. त्या टँकरमध्ये शेकडो कोटी रुपयांचा घोटाळा झाला. ते आता सरकार दरबारी सुद्धा मान्य केले गेले आहे. त्यामुळे टँकर माफियांविरुद्ध कठोर कारवाई करून घोटाळ्याचे पैसे वसूल करावे. यासंदर्भात विधानपरिषदेत आवाज उठवणार असल्याचे सुद्धा ते पुढे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...