आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यक्तीने खरेदी केले नवीन घर आणि त्याच्या चारही बाजूने लावले मोठे ट्यूब, शेजारांना समजले नाही कारण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेक्सास. घर खरेदी करणे ही आयुष्यातील सर्वात मोठी गुंतवणूक असते. प्रत्येकाला आपले घर सुरक्षित ठेवायचे असते. अमेरिकेच्या टेक्सासमध्ये राहणा-या एका व्यक्तीने नवीन घर खरेदी केले. तेव्हा घराला 400 फुट लांब ट्यूबने घेरले. ही ट्यूब पाहणा-या शेज-यांना आणि इतर लोकांना यामागचे कारण समजले नाही. पण काही महिन्यांनंतर अथॉरिटीने पुराचा इशारा दिला आणि घर रिकामे करण्यास सांगितले. तेव्हा हा व्यक्ती आपल्या घरातच राहिला. या ट्यूबमुळे तो पुर्णपणे सुरक्षित राहिला. हे पाहिल्यानंतर लोकांना त्याची स्तुती केली. 

 

घराच्या आजुबाजूला लावली जाड ट्यूब 
- रैंडीने टेक्सासमध्ये घर खरेदी केले तेव्हा त्याला त्या लोकेशनवर येणा-या समस्यांची जाणिव होती. जवळच ब्रोजोस नदी आहे, यामध्ये पाण्याची पातळी वाढल्यानंतर नेहमीच पुर येतो. 
- या पुरापासून आपल्या घराला सुरक्षित ठेवण्यासाठी रैंडीने विविध पध्दती शोधल्या. यावेळी त्याला एक्वाडॅमविषयी कळाले आणि त्याने आपल्या घराच्या चारही बाजूला हे इंस्टॉल करण्याचा निर्णय घेतला. 
- त्याने आपल्या घराच्या चारही बाजूला प्लास्टिक ट्यूब लावले. 400 फूट लांब असणा-या या ट्यूबमध्ये पाणी भरले आणि हे एखाद्या डॅम किंवा सँडबॅगप्रमाणे काम करते.
- हे सेट करण्यात आणि इंस्टॉल करण्यात दिर्घकाळ लागला. पण हे पुर्णपणे सेट झाल्यानंतर हे हलणेही कठीण होते आणि यामुळे घर पुर्णपणे सुरक्षित झाले. 
- पण जेव्हा लोकांना याविषयी माहिती नव्हती, तेव्हा लोक त्याला पाहून खिल्ली उवडत होते. त्यांना ही ट्यूब लावण्याचे कारण समजले नव्हते आणि याची फायदेही माहिती नव्हते.

 

पुरामध्ये उघडले शेजा-यांचे डोळे 
- पावसाच्या वेळी अथॉरिटीने सर्वांना घर रिकामे करण्याचे आदेश दिले, तेव्हा रैंडीचे घर पुर्णपणे सुरक्षित होते. 
- रैंडी भीषण पुरामध्ये आपल्या घरातच राहित होता आणि पुर्णपणे सुरक्षित होता. या काळात त्याने घरात जास्त सामानाचा स्टॉक जमा केला होता.
- घर सुरक्षित करण्यासाठी त्याला 6 लाख खर्च करावे लागले होते. पण अनेक महिन्यांची समस्या त्याने दूर केली होती. 
- ट्यूबमुळे रैंडीचे घर सुरक्षित राहिले यानंतर शेजा-यांना त्याची किंमत कळाली आणि सर्वांनी त्याची स्तुती केली.
 

 

 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...