आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळ प्रश्नावर मनसे आक्रमक; औरंगाबादेत 27 रोजी दंडुका मोर्चा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यात पडलेल्या दुष्काळाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आता मनसेही मैदानात उतरली असून मनसेद्वारे २७ नोव्हेंबरला औरंगाबादमध्ये दंडुका मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चानंतरही राज्य सरकारने दुष्काळग्रस्तांची परवड सुरूच ठेवल्यास राज्यभर आक्रमकपणे आंदोलन राबवण्याचा इशाराही मनसेने दिला आहे. राज्य सरकारने जाहीर केलेला दुष्काळ फक्त कागदावरच अस्तित्वात असून प्रत्यक्षात मात्र दुष्काळग्रस्त भागात राज्य सरकारकडून आवश्यक त्या कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत.

 

त्यामुळे सरकारचे डोके ठिकाणावर आणण्यासाठी दंडुका हातात घेण्याशिवाय पर्याय नसल्याचेही मनसेने सांगितले.मनसेचे नेते अनिल शिदोरे, नितीन सरदेसाई आणि शिरीष सावंत यांनी मुंबईतील मनसेच्या राजगड या मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत या आंदोलनाबाबत माहिती दिली. या  वेळी मनसेचे पदािधकारी उपस्थित होते.

 

शेतकऱ्यांच्या नुकसानीला सरकारच जबाबदार  
दुष्काळी परिस्थितीची कोणतीच माहिती सरकारकडे नाही. खरीप हंगामाच्या मध्यावरच दुष्काळ पडणार, याची कल्पना आली असतानाही सरकार ढिम्म बसून राहिल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. या सर्व नुकसानीला राज्य सरकारच जबाबदार असल्याचेही मनसेच्या वतीने सांगण्यात आले. शिवाय केंद्र सरकारद्वारे २०१६ मध्ये जारी केलेल्या दुष्काळ निवारण संहितेनुसार दुष्काळ जाहीर केल्यानंतर दुष्काळी भागात दुष्काळ देखरेख केंद्रे स्थापन करणे आवश्यक आहे. मात्र अशी कोणतीही हालचाल प्रशासकीय पातळीवर दिसत नसल्याचा आरोपही मनसे नेत्यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...