आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंनी जाहीर केले मनसेचे 27 उमेदवार, धर्मा पाटील यांच्या मुलाला सिंदखेडामधून उमेदवारी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेन आपली पहिली यादी जाहीर केली आहे. मनसेने आपल्या पहिल्या यादीत 27 उमेदवारांची घोषणा केली. यादीत मंत्रालयात आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांना धुळ्यातील सिंदखेडा मतदारसंघातून उमेदवारी घोषित झाली आहे. 






काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याची घोषणा केली. राज ठाकरेंनी 5 ऑक्टोबरला पहिली प्रचारसभा घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या मनसेने आपल्या 27 उमेदवारांची नावे घोषित केली. तसेच, रोज पाच-सहा नावे जाहीर करेन, असे राज यांनी सांगितले आहे.
 

मनसेचे उमेदवार
1- प्रकाश भोईर - कल्याण पश्चिम
2- अशोक मुर्तडक - नाशिक पूर्व
3- संदीप देशपांडे - माहिम
4- वसंत मोरे - हडपसर
5- किशोर शिंदे - कोथरुड
6- प्रमोद पाटील - कल्याण ग्रामीण
7- राजू उंबरकर - वणी
8- अविनाश जाधव - ठाणे
9- नितीन भोसले - नाशिक मध्य
10- अजय शिंदे - कसबा पेठ, पुणे
11- नरेंद्र धर्मा पाटील - सिंदखेड
12- दिलीप दातीर - नाशिक पश्चिम
13- नयन कदम - मागाठाणे
14- संजय तुर्डे - कलिना
15- योगेश शेवेरे- इगतपुरी
16- अतुल बंदिले - हिंगणघाट
17- कर्णबाळा दुनबळे - चेंबूर
18-सुहास निम्हण - शिवाजीनगर
19- गजानन काळे - बेलापूर
20- प्रशांत नवगिरे - तुळजापूर
21- राजेश वेरुणकर - दहीसर
22- अरुण सुर्वे - दिंडोशी
23- हेमंत कांबळे - कांदिवली पूर्व
24- वीरेंद्र जाधव - गोरेगाव
25- संदेश देसाई -वर्सोवा
26- गणेश चुक्कल - घाटकोपर पश्चिम
27- अखिल चित्रे- वांद्रे पूर्व