आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज(14 ऑक्टोबर) पुण्यातील कसबा मतदारसंघात मनसेचे उमेदवार अजय शिंदे यांच्या प्रचारासाठी जाहीर पार पडली. राज ठाकरे यांची ही पुण्यातील पहिली सभा होती. सभेत राज ठाकरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. ''महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरस्थिती होती, पण असे असताना सत्ताधारी निवडणुकांच्या प्रचारात मग्न होते. त्यादरम्यान काय झालं? तर कोल्हापूरचे एक मंत्रीच पुण्यात वाहत आले. पण, मनसेचा उमेदवार या "चंपाची" चंपी केल्याशिवाय राहणार नाही." अशा शब्दांत राज यांनी चंद्रकांत पाटलांव टीकास्त्र सोडले.
"पुण्याच्या वैभवशाली इतिहासाचा सत्ताधाऱ्यांना विसर पडला आहे. शिवस्मारक करू, हे आश्वासन आघाडीच्या काळात देण्यात आले होते. त्यानंतर महायुतीच्या सरकारने स्मारक करण्याची घोषणा केली. नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जलपूजनही केले. पण, आता ते कुठे केलं हेदेखील कुणाला सांगता येणार नाही." असा टोला राज यांनी सरकारवर लगावला. तसेच, "गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक उभारुनही झाले. मात्र, शिवस्मारक का उभे रहात नाही?" असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला.
"मतदान होतं आहे, बहुमत मिळतं आहे. मग राज्य आणि देशच्या प्रगतीचा आलेख का खालावतोय ? असे राज ठाकरे म्हणाले. आज सिंचनाच्या नावानेही महायुतीच्या सत्तेतही बोंब आहे." अशीही टीका राज ठाकरेंनी केली. तसेच, "ज्या वेगात नोकऱ्या जात आहेत, ते पाहता प्रत्येक तरुणाच्या मनात एक धाकधूक आहे कि, 'माझी नोकरी कधीही जाऊ शकते'. ह्याचे कारण सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे आलेली भीषण आर्थिक मंदी."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.