आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंचा दिल्ली दौरा: निवडणूक आयुक्तांची घेतली भेट, बॅलट पेपरवरून मतदान घेण्याची मागणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई / नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत काँग्रेससाठी प्रचार करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी थेट दिल्ली दौरा केला. यावेळी त्यांनी निवडणूक आयुक्तांची भेट घेतली आणि ईव्हीएमवर आपला आक्षेप नोंदविला. निवडणुकांमध्ये मतदान बॅलट पेपरवरूनच घेण्यात यावे अशी मागणी त्यांनी आयोगाकडे केली आहे. या भेटीनंतर राज ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलातना, निवडणूक आयुक्तांची भेट घेतली तरीही यासंदर्भात आयोगाकडून आपल्याला काहीच अपेक्षा नाहीत असे राज ठाकरे म्हणाले आहेत.


पक्षाची स्थापना करण्यापूर्वी राज ठाकरेंनी दिल्ली दौरा केला होता. त्यानंतर पहिल्यांदाच ते देशाच्या राजधानीत पोहोचले. गेल्या 14 वर्षांत दिल्ली खूप बदलली असे राज ठाकरे म्हणाले आहेत. निवडणूक आयुक्तांची भेट ही केवळ औपचारिकता होती. आता ईव्हीएमवर काय करायचे हे महाराष्ट्रात पोहोचल्यावर ठरवू असे सूचक विधान मनसे अध्यक्षांनी केले आहेत. विशेष म्हणजे, लोकसभा निवडणूक लढवली नाही तरीही राज ठाकरेंनी काँग्रेससाठी प्रचारात सहभाग नोंदवला होता. या निवडणुकीत पराभूत झालेल्यांना तर सोडाच विजयी होणाऱ्यांना सुद्धा ईव्हीएमवर शंका असल्याचे यावेळी राज ठाकरेंनी सांगितले. येत्या काही महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका अपेक्षित आहेत. या निवडणुकीत मनसेची काय रणनिती असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरवरच घ्या
निवडणूक आयोगाला दिलेल्या निवेदनात राज ठाकरे म्हणाले, की अनेकांनी त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन ईव्हीएम मशीनवर नाराजी आणि शंका उपस्थित केली. गेल्या काही वर्षांपासून ईव्हीएमच्या माध्यमातून होणाऱ्या निवडणुकांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे, आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवरच घेण्यात यावी असे आवाहन मनसे अध्यक्षांनी केले आहे.