आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्तेत नसताना मनसेने 78 टोलनाके बंद केले, 5 वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनाचे काय झाले -राज ठाकरे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - नेरुळ येथील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांच्या त्याच-त्या आश्वासनांवरून नेत्यांसह जनतेलाही उपदेश दिले. यावेळी किमान गांभीर्याने घेत जागरुक राहून मतदान करा असे आवाहन राज ठाकरेंनी केले. यासोबतच, परप्रांतीयांमुळे महाराष्ट्रावरील ओझे वाढले असेही ते पुढे म्हणाले. राज यांनी आपल्या सभेच्या माध्यमातून टोल नाके, सर्वसामान्यांच्या समस्या आणि इतर विषयांवर प्रामुख्याने भाजपवर निशाणा साधला.

78 टोलनाके बंद केले, सरकारच्या आश्वासनांचे काय?
सत्ताधारी लोक पुन्हा-पुन्हा निवडणुकांमध्ये तेच मुद्दे घेऊन जनतेसमोर येतात. यात नेत्यांसह जनतेची देखील चूक आहे. तुम्ही या नेत्यांना जाब विचारत नाही म्हणून त्यांची हिंमत वाढते. सरकारने 5 वर्षांपूर्वी राज्यातील टोल नाके बंद करणार असे आश्वासन दिले होते. त्यांनी सत्तेत राहून केले नाही आणि मनसेने सत्तेत नसतानाही 78 टोलनाके बंद केले. सरकारने दिलेल्या आश्वासनांचे काय झाले असा सवाल राज यांनी उपस्थित केला.

अल्पेश ठाकोरच्या भाजप प्रवेशावरही चिमटा
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात परप्रांतीय आणि मराठी युवकांच्या रोजगाराचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी बोलताना मराठी माणसांच्या रोजगारासाठी परप्रांतीयांविरुद्ध आंदोलन केले तेव्हा आपल्याला कसे देशभर एक खलनायक म्हणून कुप्रसिद्ध करण्यात आले होते याची आठवण त्यांनी काढली. सोबतच, अल्पेश ठाकोरचे उदाहरण दिले. अल्पेश ठाकोरने एका घटनेनंतर गुजरातमधून 20 हजार उत्तर भारतीयांना हकलून लावले होते. त्यावेळी माध्यम कसे शांत होते. त्यातही भाजपने त्याला पक्षात प्रवेश आणि सन्मान दिला हे लोकांना कसे दिसत नाही असेही राज ठाकरेंनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...