आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोहिनूर प्रकरण : अशा कितीही चौकशा केल्या तरी माझं तोंड बंद होणार नाही; राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कोहिनूर स्वेअर प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने चौकशीसाठी बोलवले होते. चौकशीनंतर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. ''अशाप्रकारच्या कितीही गोष्टी त्यांनी माझ्यावर केल्या तर मी माझं तोंड बंद करणार नाही. मी योग्य वेळी तुमच्याशी बोलेन,'' अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे.  

गुरुवारी ईडीने राज ठाकरेंची तब्बल साडे आठ तास चौकशी केली. बुधवारी सकाळी साडेअकरा वाजते ते ईडी कार्यालयात दाखल झाले. तर रात्री सव्वाआठ वाजता राज बाहेर आले. चौकशीनतंर राज आपल्या कृष्णकुंज निवासस्थानी पोहोचले तेव्हा कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी राज यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानत दोन वाक्यात प्रतिक्रिया दिली.