राज ठाकरेंचा पंतप्रधानांवर / राज ठाकरेंचा पंतप्रधानांवर निशाणा, मोदींनीच घेतली मोदींची मुलाखत, रेखाटले व्यंगचित्रात

Jan 03,2019 02:56:00 PM IST

मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीवर राज यांनी व्यंगचित्राद्वारे टीकास्त्र सोडले आहे. ही मुलाखत म्हणजे मोदींनीच मोदींची मुलाखत घेतल्यासारखे असल्याचा टोला राज ठाकरेंनी आपल्या व्यंगचित्राद्वारे लगावला आहे. 'एक मनमोकळी मुलाखत', असे या व्यंगचित्राला राज यांनी ‍शीर्षक दिले आहे.

मोदींनीच घेतली मोदींची मुलाखत

नरेंद्र मोदी यांनी स्वत:ची मुलाखत घेतल्याचे राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रात रेखाटले आहे. मुलाखत घेणारे मोदी मुलाखत देणाऱ्या मोदींना 'बोला काय विचारु?' असे विचारताना दिसत आहेत.

दरम्यान, नववर्ष 2019 च्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान मोदींनी 'एएनआय' या वृत्तसंस्थेला प्रदीर्घ मुलाखत दिली. एएनआयच्या संपादक स्मिता प्रकाश यांच्या अनेक प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. काळा पैसा, नोटाबंदी, जीएसटी, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील भाजपचा पराभव यासारखी अनेक प्रश्ने स्मिता प्रकाश यांनी मोदींनी विचारली होती. दुसरीकडे मात्र, विरोधकांनी मोदींच्या या मुलाखतीवर जोरदार टीका केली आहे.

माझेच प्रश्न अन् माझीच उत्तरं..
दुसरीकडे, राष्‍ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. 'माझेच प्रश्न अन् माझीच उत्तरे' असे शीर्षक देऊन जयंत पाटील यांनी एक ट्‍विट केले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला नरेंद्र मोदी यांनी दिलेली मुलाखत 'फिक्स' होती, असे आरोपीही जयंत पाटील यांनी केला आहे.

X