आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पावसामुळे प्रचार सभांवर प्रश्नचिन्ह, मनसेने निवडणूक आयोगाकडे रस्त्यावर सभा घेण्याची मागणी केली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुण्यात सध्या पावसाची जोरदार बॅटींग सुरू आहे. शहरातील मैदाने चिखलाने भरलेत. त्यामुळे, निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांना सभांसाठी मोठ्या अडचणी येत आहेत. कालच पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा आयोजित केली होती. पण, पुण्यात जोरदार पाऊस सुरू सभा मैदान चिखलाने भरले आणि सभा रद्द करण्याची वेळ आली. त्यानंतर आता मनसेने रस्त्यावर सभा घेण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. येत्या 14 ऑक्टोबरला राज ठाकरेंची पुण्यातील कसबा मतदारसंघात सभा आयोजित केली आहे.गुरुवारी कसबा येथील मनसेची सभा पावसामुळे रद्द करावी लागली. अनेक मैदानांच्या ठिकाणी सायलन्ट झोन आहे. हवामान खात्याने 20 ऑक्टोबरपर्यंत परतीच्या पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे सांगितलं आहे. त्यामुळे या काळात मैदानात प्रचारसभा घेणे शक्य होणार नाही. असाच पाऊस पडत राहिला तर मैदानांवर चिखल होईल आणि चिखलात सभा घेता येणार नाही. म्हणूनच निवडणूक आयोगाने रस्त्यावर सभेसाठी परवानगी द्यावी असी मनसेने विनंती केली आहे.