आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभा निवडणूक लढवली नाही तर पक्ष फुटण्याची मनसेला भीती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक लढवायची की नाही याबाबत मनसे द्विधा मन:स्थितीत आहे. 'ईव्हीएम'वर खापर फाेडून यापूर्वीच पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी लाेकसभेप्रमाणे याही निवडणुकीपासून दूर राहण्याचे संकेत दिले हाेते. मात्र निवडणूक लढवायलाच हवी. तसे न केल्यास पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते इतर पक्षाशी जवळीक साधू शकतात, असे काही पदाधिकाऱ्यांना वाटते. हे मत त्यांनी शुक्रवारी एका बैठकीत राज ठाकरेंसमाेर बाेलून दाखवले. तर काही नेत्यांनी मात्र राज ठाकरेंच्या मताशी सहमती दर्शवली. या बैठकीत वेळी राज यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले.

अद्याप निर्णय झालेला नाही... 
बाळा नांदगावकर : लवकरच या विषयावर स्वत: राज ठाकरे अापली भूमिका स्पष्ट करणार आहेत. या विषयावर मनसेचे नेेते बाळा नांदगावकर म्हणाले, 'अद्याप पक्षाचा काेणताही निर्णय झालेला नाही. निवडणूक लढवण्याच्या मुद्द्यावर सर्वांची मते जाणून घेतली जात आहेत. याेग्य वेळी स्वत: राज ठाकरे निर्णय जाहीर करतील.'

बातम्या आणखी आहेत...