औरंगाबाद / मनसेने भूमिका बदलली नाही, उलट अनेकांनी सत्तेसाठी भूमिका बदलल्या - राज ठाकरे

  • औरंगाबादचे नाव बदलले तर काय हरकत आहे?  राज ठाकरेंचा सवाल 
  • मला हिंदू जननायक म्हणू नका, राज ठाकरे यांचे आवाहन 

दिव्य मराठी वेब टीम

Feb 14,2020 12:00:29 PM IST

औरंगाबाद - मला हिंदू जननायक म्हणून नका असे आवाहन राज यांनी केले आहे. मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेल्या राज यांनी औरंगाबादमध्ये आज पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते. मनसेच्या पहिल्या राज्य अधिवेशात झेंड्याचा रंग बदलण्यात आला. त्यानंतर मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा स्वीकारला आहे. यानंतर राज यांच्याकडे हिंदू जननायक म्हणून पाहिले जात आहे. राज ठाकरे सध्या तीन दिवसीय मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी आज औरंगाबाद येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.

हिंदू जननायक ही उपाधी आमच्या पक्षाकडून देण्यात आली नाही

राज ठाकरे म्हणाले की, 'हिंदू जननायक' ही उपाधी आमच्या पक्षाकडून देण्यात आलेली नाही. एका वृत्तवाहिनीने असे संबोधले होते. तुम्ही त्यांनाही विचारु शकता. तसेच मला हिंदू जननायक म्हणू नका असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे.

औरंगाबादचे नाव बदलले तर काय हरकत आहे? राज ठाकरेंचा सवाल


औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्यात यावे अशी मनसेने उचलून धरली आहे.यापूर्वी ही मागणी शिवसेनेची होती. औरंगाबादचे नाव बदलले तर काय हरकत आहे? असा सवाल राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. चांगले बदल झालेच पाहिजेत. असे म्हणत राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.

भूमिका बदलून अनेक जण सत्तेत आले

तसेच आता मनसेने आपल्या पक्षाची भूमिका पूर्णपणे बदलली आहे. मनसे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजकारण करत आहे. यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मी भूमिका बदलली नाही. घुसखोरांना आणि पाकिस्तानी कलाकारांना माझा पूर्वीपासून विरोध होता. उलट भूमिका बदलून अनेकांनी सत्ता स्थापन केली आहे.

X